ऑक्टोबर महिन्यात ‘या’ 15 दिवसांसाठी बँका राहणार बंद ! कर्मचाऱ्यांची चांदी, मात्र सर्वसामान्यांचे होणार हाल, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking News : आज सप्टेंबर महिन्याचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात तब्बल पंधरा ते सोळा दिवसांसाठी बँका बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांची चांदी होणार आहे तर सर्वसामान्यांचे हाल होतील असे बोलले जात आहे.

अशा परिस्थितीत जर ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला काही बँकिंग कामे करायची असतील, तुमचे बँकेत काही काम असेल तर तुम्हाला बँकेतील सुट्ट्यांचा विचार करून या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. यामुळे ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे. RBI कडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात विविध सणानिमित्त आणि महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्ट्या खूपच अधिक आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

परिणामी पुढल्या महिन्यात 16 दिवसांसाठी बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या तारखेला बँकांना सुट्टी असेल याविषयी जाणून घेणार आहोत. खरतर ऑक्टोबरचा महिना हा 31 दिवसांचा असतो. पण यावर्षी ऑक्टोबर मध्ये तब्बल 16 दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. यामध्ये शासकीय सुट्ट्या, पाच रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश असेल.

साहजिकच यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तथापी या सुट्ट्या देशातील सर्वच राज्यातील सर्वच बँकांमध्ये राहतील असे नाही. तर राज्यनिहाय सुट्ट्यामध्ये फरक राहणार आहे. आता आपण ऑक्टोबर महिन्यात कोणत्या दिवशी बँकेला शासकीय सुट्टी राहणार आहे याची यादी पाहणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक ऑक्टोबरला रविवार आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती निमित्त देशभर बँका बंद राहतील. आठ ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँक बंद असेल. तसेच 14 ऑक्टोबर रोजी दुसरा शनिवार असल्याने संपूर्ण देशभरात बँका बंद राहतील. 15 ऑक्टोबरला घटस्थापना आणि रविवार असल्याने संपूर्ण देशभर बँका बंद असतील.

18 ऑक्टोबरला कटी बिहू या सणानिमित्त आसाममध्ये बँका बंद असतील. 21 ऑक्टोबर रोजी दुर्गा पुजा निमित्ताने त्रिपुरा, असाम, मणिपूर व बंगाल या ठिकाणी बँका बंद असतील. 22 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. 23 ऑक्टोबर रोजी देशातील काही भागात दसरा आणि महानवमी साजरा केला जाणार आहे.

यामुळे 23 तारखेला कर्नाटक ओडिशा तामिळनाडू आसाम, आंध्रप्रदेश केरळ बिहार या राज्यात बँका बंद राहणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी असल्याने आंध्रप्रदेश मणिपूर वगळता सर्व राज्यात बँका बंद असतील. 25 ऑक्टोबर रोजी दुर्गा पुजा निमित्ताने सिक्कीम येथे बँका बंद असतील. 26 ऑक्टोबर रोजी दुर्गा पूजा आणि विलय दिवस म्हणून सिक्कीम आणि जम्मू काश्मीर येथे बँका बंद असतील.

27 ऑक्टोबर रोजी दुर्गा पुजा निमित्ताने सिक्कीम येथे बँका बंद राहतील. 28 ऑक्टोबर रोजी चौथा शनिवार असल्याने संपूर्ण देशभरात आणि लक्ष्मीपूजन निमित्ताने बंगालमध्ये बँका बंद असतील. 29 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने संपूर्ण देशभरात बँका बंद असतील. 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्ताने गुजरात राज्यात बँका बंद असतील.

महाराष्ट्रात किती दिवस बँका बंद असतील?

ऑक्टोबर मध्ये आपल्या राज्यात एक ऑक्टोबर, दोन ऑक्टोबर, 8 ऑक्टोबर, 14 ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 24 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर आणि 29 ऑक्टोबर रोजी बँका बंद राहणार आहे. अर्थातच आपल्या राज्यात फक्त 9 दिवस बँका बंद राहतील.