Bank Of Baroda FD Scheme : गेल्या काही महिन्यांमध्ये FD व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आता एफडीमध्ये गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा विशेष कल असल्याचे पाहायला मिळत आहे. महिला गुंतवणूकदार देखील आता एफडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
पूर्वी महिला मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदी या मौल्यवान धातू मध्ये गुंतवणुकीला महत्त्व देत असत. आता मात्र महिला देखील एफडीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू लागले आहेत. एफडी मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.
शिवाय आता एफडीमध्ये चांगला परतावा देखील मिळत असल्याने येथे गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरत आहे.
दरम्यान, आज आपण बँक ऑफ बडोदाच्या एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे जर तुम्हालाही नजीकच्या भविष्यात एफडी करायची असेल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
बँक ऑफ बडोदाची स्पेशल एफडी योजना
बँक ऑफ बडोदाने बीओबी 360 नावाची एक स्पेशल एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 360 दिवसांच्या कालावधीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करता येत आहे.
विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणुकीसाठी बँकेच्या माध्यमातून चांगले व्याजदर ऑफर केले जात आहे. 360 दिवसांमध्ये परिपक्व होणाऱ्या या एफडी योजनेत गुंतवणुकीसाठी तब्बल 7.60% एवढे व्याजदर दिले जात आहे.
हे बँक ऑफ बडोदाची सर्वाधिक व्याज देणारी एफडी योजना आहे. या एफडी योजनेअंतर्गत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.60% एवढे व्याजदर ऑफर केले जात आहे.
या योजनेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे गुंतवणूकदारांना किमान एक हजार रुपयांपासून या एफ डी योजनेत गुंतवणूक करता येते.
या योजनेत जास्तीत जास्त दोन कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते. एफडी योजनेत ऑटोरीन्यूअल आणि नॉमिनेशनची सुविधा देखील गुंतवणूकदारांना उपलब्ध होते.
जर तुम्हाला या एफडी योजनेची सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही याबाबतची तपशीलवार माहिती bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन जाणून घेऊ शकता.