Banana Powder Making Business : तुम्हालाही नजीकच्या भविष्यात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का? हो मग आजचा हा लेख तुमच्यासाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे. आज आपण अगदी दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीत सुरू होणाऱ्या व्यवसायाची माहिती पाहणार आहोत. खरंतर कोरोना काळापासून भारतात व्यवसायांची संख्या वाढली आहे.
पण, अनेकांना कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. दरम्यान आज आपण कमी गुंतवणूकीत सुरु होऊ शकणाऱ्या एका भन्नाट बिजनेस प्लॅनची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण अवघ्या 10 हजाराच्या गुंतवणूकीत सुरु होऊ शकणाऱ्या बनाना पावडर मेकिंग बिजनेसची माहिती जाणून घेणार आहोत.
कसा सुरु करणार बनाना पावडर मेकिंग बिजनेस?
खरेतर बाजारात केळी पावडरला मोठी मागणी आहे. यामुळे हा एक फायदेशीर बिजनेस प्लॅन ठरणार आहे. तुम्ही हा व्यवसाय सुरू करताच तुमची कमाई सुरू होणार आहे. हा बिजनेस सुरु करण्यासाठी खर्चही खूप कमी करावा लागणार आहे.
जर शेतकऱ्यांनी केळीची लागवड सुरु केली आणि त्यावरचं प्रक्रिया करून पावडर बनवली तर त्यांना अधिक फायदा होणार आहे. इतरही लोकांना बनाना पावडर मेकिंग बिजनेस सुरु करता येणार आहे. केळी पावडर बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 10,000-15,000 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.
केळी पावडर बनवण्यासाठी दोन मशीन लागणार आहेत. या बिजनेससाठी तुम्हाला केळी ड्रायर मशीन आणि मिश्रण मशीन हे दोन मशीन लागणार आहेत. www.indiamart.com या वेबसाइटवरून तुम्ही ही मशीन्स ऑनलाइन खरेदी करू शकणार आहात. तुम्ही ऑफलाईन मार्केटमधून सुद्धा हे मशीन खरेदी करू शकता.
केळी पावडर कशी बनवणार ?
केळी पावडर बनवण्यासाठी सर्वप्रथम केळीची हिरवी फळे सोडियम हायपोक्लोराईटच्या द्रावणाने स्वच्छ करावी लागणार आहेत. नंतर मग हाताने सोलून घ्या आणि लगेच सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात 5 मिनिटे बुडवावीत. यानंतर, फळांचे लहान तुकडे करावेत.
नंतर केळीचे तुकडे 60 अंश सेल्सिअस तापमानात गरम हवेच्या ओव्हनमध्ये 24 तास सुकविण्यासाठी ठेवले जातात. जेणेकरून केळीचे तुकडे पूर्णपणे कोरडे होतील. यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. हे तुकडे बारीक पावडर तयार होईपर्यंत बारीक करून घ्या. मग ही पावडर विक्रीसाठी तयार होत असते.
कमाई किती होणार
केळीपासून तयार केलेली भुकटी फिक्कट पिवळ्या रंगाची असते. तयार पावडर पॉलिथिनच्या पिशवीत किंवा काचेच्या बाटलीत पॅक करता येते. केळी पावडर बनवण्याचा खर्च खूपच कमी आहे. यासाठी लागणारा कच्चा माल तुम्ही थेट शेतकऱ्याकडून खरेदी करू शकता.
बाजारात केळीची पावडर 800 ते 1000 रुपये किलो दराने विकली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जर तुम्ही रोज 5 किलो केळी पावडर बनवली तर तुमचा रोजचा नफा हा 3500 ते 4500 रुपये होईल.