राज्याचे अर्थसंकल्प गेल्या काही दिवसात पार पडले. त्यामध्ये शेती क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात योजना राबवण्यात येणार असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
तर राज्यातील फळबागांना नवसंजीवनी देण्यासाठी या वर्षीत 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे अर्थसंकल्पात जाहीर झाले आहे. त्यामुळे राज्यातील फळबाग लागवडीच्या सुधारित धोरणाचा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
फळबाग लागवडीचे सुधारित धोरणानुसार फळबाग लागवड योजनेतून केळी,द्राक्षे,ॲव्होकॅडो,ड्रॅगन फ्रूट इत्यादी फळ पिके तसेच अन्य महत्त्वाच्या मसाला पिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. तर जळगाव आणि पालघर जिल्ह्यातील वसई येथे मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते.
मुख्यतःजळगाव जिल्ह्यातील शेतकरी हा केळी उत्पादनावर अवलंबून आहेत. यामुळे केळी पिकाला फळाचा दर्जा देण्यासाठी या भागातून सतत मागणी गेली जात होती.त्या संदर्भात पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या मागणीला आता यश आले
आसून अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील तरतुदीमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळ लागवड योजनेत यंदा पहिल्यांदाच केळी फळाचा समावेश करण्यात आलेला आहे.त्यामुळे आता प्रक्रिया उद्योगात केळी उत्पादकांना विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागणार नाही.