कापूस हे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश मध्ये कापसाची लागवड सर्वाधिक होते. गुजरात मधीलही जवळपास 11 जिल्ह्यांमध्ये कापसाची शेती केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून कापसाचे पीक शेतकऱ्यांसाठी थोडेसे त्रासदायक ठरू लागले आहे. कारण की, गेल्या दोन वर्षांपासून बाजारात कापसाला अपेक्षित भाव मिळत नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये कापसाला खूपच नगण्य भाव मिळाला होता आणि यामुळे तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हेच कारण आहे की यावर्षी राज्यासहित गुजरात मध्ये कापूस लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट आली आहे.…
Author: Suraj Kokate
राज्यासहित संपूर्ण भारतात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला लागवड केली जात आहे. भाजीपाल्याची लागवड आपल्या राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात केली जाते. टोमॅटो, वांगी, मिरची अशा भाजीपाला पिकांची लागवड सर्वाधिक होते. विशेष म्हणजे बाजारात या भाजीपाला पिकांना मोठी मागणी असते. मात्र या पिकांची लागवड थोडीशी रिस्की असते. टोमॅटो, वांगी, मिरची अशा भाजीपाला पिकांवर विविध किटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. मिरची पिकावर फुलकीडी, पांढरी माशी आणि फळ पोखरणारी अळी या कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. वांगी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, शेंडा व फळ पोखरणारी अळी यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तसेच टोमॅटो पिकात नाग अळी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या…
जून महिन्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती. विशेष म्हणजे जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची विश्रांती पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र,आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दृश्य पाहायला मिळते. अशातच, आता भारतीय हवामान खात्याचा एक सुधारित हवामान अंदाज समोर आला आहे. या हवामान अंदाजात भारतीय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील संबंधित जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला…
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मंगळवारी, 23 जुलै 2024 ला लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तिसऱ्यांदा सत्ता स्थापित केल्यानंतर केंद्रातील सरकार पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडणार आहे. यामुळे अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. सर्वसामान्यांना देखील या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोठी भेट देणार अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान आजचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्लीपर वंदे भारत आणि वंदे भारत मेट्रोला गती मिळेल असे बोलले जात आहे. खरे तरच सध्या स्थितीला भारतातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे. यातील आठ मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत हे विशेष. राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर,…
Maharashtra Rain : गेल्या जून महिन्यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पावसाचा लहरीपणा अनुभवायला मिळाला. वेळेआधीच मान्सून आगमन झाल्यानंतर सुद्धा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे शेतकरी अगदीच चिंतेत सापडले होते. पण जुलै मध्ये चांगला पाऊस होणार असे IMD ने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये स्पष्ट केले होते. यानुसार आता जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला आहे. जुलैचा पहिला आठवडा कोरडा राहिल्यानंतर आता राज्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी तर अतिवृष्टी सारख्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसापासून ज्या मुसळधार पावसाच्या आतुरतेने…
गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, पुणे सारख्या महानगरांमध्ये तर किमतीचा आलेख हा सर्वाधिक वाढलेला दिसतोय. त्यामुळे या अशा महानगरांमध्ये घर खरेदीचे स्वप्न उराशी बाळगणारे बहुतांशी लोक म्हाडा आणि सिडकोच्या घरांची वाट पाहत असतात. म्हाडा आणि सिडको प्राधिकरण नागरिकांना परवडणाऱ्या दरात सदनिका उपलब्ध करून देत आहे. यामुळे जेव्हा-केव्हा म्हाडा किंवा मग सिडको कडून घरांसाठी लॉटरी जाहीर केली जात असते तेव्हा या घरांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतो. विशेषता मुंबईमधील घरांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आणि लाखोंच्या संख्येने नागरिक या घरांसाठी अर्ज करतात. दरम्यान सिडकोने जानेवारी महिन्यात एक लॉटरी…
राज्यातील अनेक प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कापूस लागवड होऊन सव्वा महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. काही ठिकाणी कापसाचे पीक एका महिन्याचे झाले आहे. तर काही ठिकाणी हे पीक 45 ते 50 दिवसांचे आहे. अशा या परिस्थितीत कापूस पिकात फुटव्यांची संख्या वाढली पाहिजे यासाठी फवारणी घेणे आवश्यक असते. तसेच या काळात कापसाच्या पिकावर मावा, तुडतुडे, फुल किडे, पांढरी माशी अशा विविध रस शोषक किडींचा प्रादुर्भाव देखील पाहायला मिळतो. या किडीचा प्रादुर्भाव जर योग्य वेळी नियंत्रणात आणला गेला नाही तर पिकाचे मोठे नुकसान होते. यामुळे या कीटकांवर नियंत्रण मिळवणे देखील आवश्यक असते. एवढेच नाही तर सध्या अनेक प्रमुख कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये ढगाळ…
नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. यानंतर या योजनेचा शासन निर्णय निघाला. तसेच एक जुलैपासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणजे एका वर्षात पात्र महिलांना अठरा हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे सध्या या योजनेची मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सध्या महिलावर्ग कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यात व्यस्त आहे. तहसील मध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अर्ज भरण्यासाठी सुद्धा महिलांच्या रांगा लागलेल्या आहेत. तथापि या योजनेसाठी अर्ज करण्यास शिंदे सरकारने…
सध्या सुशिक्षित बेरोजगारांच्या तुलनेमध्ये उपलब्ध नोकऱ्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस खूप उग्र स्वरूप धारण करताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे अनेक व्यवसायाकडे आता सुशिक्षित तरुण-तरुणी वळताना आपल्याला दिसून येत आहेत. बरेच शेतकरी कुटुंबातील जर तरुण असतील तर ते शेती आधारित इतर प्रक्रिया उद्योग किंवा शेतीशी निगडित असलेल्या शेळी पालन किंवा कुक्कुटपालन व्यवसाय तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक दृष्टिकोनातून करत आहेत. तसेच तरुणांना व्यवसाय उभारणीसाठी मदत व्हावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबविण्यात येत आहे. अशाच प्रकारचा एक व्यवसाय आहे जो इतर प्रमाणे शेतकरी कुटुंबातील मुले देखील आरामात करू शकतात. आपल्याला माहित आहे की देशामध्ये असे अनेक…
पिक उत्पादन वाढीसाठी सर्व प्रकारचे व्यवस्थापन करणे गरजेचे असते व हे व्यवस्थापन योग्य वेळेला होणे तितकेच गरजेचे असते. पीक व्यवस्थापनामध्ये खत व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन, रोग व किडींचे व्यवस्थापन इत्यादी व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहेच.परंतु जमिनीची पूर्व मशागती पासून तर कापणी पर्यंत विविध बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे असते. जेव्हा या सगळ्या व्यवस्थापनाच्या पद्धती अगदी योग्य पद्धतीने अवलंबल्या जातात तेव्हाच एकरी जास्तीचे उत्पादन मिळते. अगदी हीच बाब जर आपण नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या गंगाधरी या गावचे सुनील जुन्नरे यांची पाहिली तर ती काहीशी या पद्धतीचीच आहे. या शेतकऱ्याने मका पिकामध्ये मास्टरी मिळवली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार…