PM Modi :भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषिप्रधान देशाचा बळीराजा एक कणा आहे. मात्र, हाच बळीराजा आपल्या देशात शेतीसाठी आवश्यक वीज मिळावी म्हणून नऊ वर्षापासून पायपीट करतोय, तरीदेखील या शेतकऱ्याला अजून वीज जोडणी देण्यात आलेली नाही. वीज जोडणी मिळत नाही म्हणुन त्रस्त झालेल्या या शेतकऱ्याने अखेर पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले आहे. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यालाच वीज मिळत नाही म्हणून थेट पंतप्रधान यांना पत्र लिहावे लागत असेल तर ही निश्चितच लाजिरवाणी बाब आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या घायगाव येथील कृष्णा रुस्तुम धने यांना 9 वर्षांपासून वीज मिळत नसल्याने पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे. कृष्णा एक अल्पभूधारक शेतकरी आहेत.…
Author: Krushi Marathi
Insect control :शेतात कीटकांमुळे रोगराईचा फैलाव जास्त प्रमाणात होत असतो.त्यामुळे त्याचा परिणाम हा पिकाच्या उत्पादनावर दिसून येतो. तर वेळेत किट नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे वापरून किडी पासून पिकांचे संरक्षण करता येते. कीटक हे त्याच्या शरीरातून एक विशिष्ट प्रकारचे गंध असलेल्या रसायनांचे मिश्रण बाहेर सोडून स्वजातीयांशी सुसंवाद साधतात.तर हाच गंध कृत्रिम पद्धतीने तयार करून गंध सापळ्यात मादी पतंगाच्या वासा द्वारे कामा गंधाद्वारे या पतंगांना आकर्षित करून सापळ्यात पकडून त्यांचा नाश करून म्हणजेच त्यांच्या मिलना मध्ये बाधा निर्माण करून पतंग वर्ग किडीचे नियंत्रण करता येते. तर गंध सापळे वापरताना पिकाच्या उंचीच्या वर साधारणपणे 1ते 1.5 फूट उंची ठेवून वापरावे तसेच या सापळ्यातील…
krushimarathi :’राज्य शासन कृष्णा खोऱ्याचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे.तर त्यामुळे मराठवाड्यातील लोकांचा पाणी प्रश्न हा मिटणार आहे. सध्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेंतर्गत मराठवाड्याला पाणी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याबाबत माहिती देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की, मराठवाडा प्रकल्पासाठी सध्या 7 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.मात्र ह्या प्रकल्पासाठी 23 टीएमसी पाण्याची आवश्यकता असून उर्वरित 16.66 टीएमसी पाणी हे कृष्णा खोरे तुन मराठवाड्याला देण्याबाबत सरकार दरबारी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. तर दर वर्षी टाटाच्या जलविद्युत प्रकल्प अंतर्गत वीज निर्मिती केल्यानंतर 42.50 टीएमसी पाणी कोकणात सोडले जाते.हेच पाणी टप्प्याटप्प्याने भीमा खोऱ्यात उपलब्ध करून मराठवाड्याला कसे देता येईल…
फुल शेती साठी भारतातील हवामान हे पोषक आसून फुलांना बाजारपेठेत वाढती मागणी लक्षात घेता फुल शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.तर येथील फुलांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. फुलांपासून तेल, अगरबत्ती, अत्तर यासारख्या उत्पादनांची परदेशात निर्यात होत आहे. गेल्या वर्षी, भारताने परदेशात सुमारे 16,949.37 मेट्रिक टन फुलांची निर्यात केली, ज्यामुळे भारताला 541.61 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले. त्यामुळे फुल शेती फायद्याची ठरत असून शेतकऱ्यांचा फुल शेती करण्याकडे कल वाढू लागला आहे. फुल शेती करताना त्याचे नियोजन फुलांची वाण निवडण, सिंचन व्यवस्थापन, व्यवस्थित संगोपन कशाप्रकारे केले पाहिजे हे आपण जाणून घेवू यात. फुलांची पिके गुलाब झेंडू जरबेरा ट्यूबरोज चमेली ग्लॅडिओलस क्रायसॅन्थेमम एस्टर…
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा म्हणून नाफेडच्या माध्यमातून हमीभाव केंद्र उभारण्यात आली.तर सध्या हमीभाव केंद्रापेक्षा खुल्या बाजारातच तुरीला अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी खुल्या बाजारातच तुरीची विक्री करत आहे. हंगामाच्या सुरवातीला खरेदी केंद्रावर तुरीला अधिकचे दर होते. तर सध्याला हमीभाव केंद्रावर तुरीला 6 हजार 300 रुपये दर मिळत आहे. तर खुल्या बाजारात त्यापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळत असल्याने हमीभाव केंद्रावरील चित्र बदलले आहे. सुरुवातीला तुरीला हमीभाव केंद्रावर 6 हजार 300 असा दर होता.तर बाजारपेठेत 5 हजार 800 आसल्या ने त्यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करून तुरीची विक्री केली. सध्याला मात्र खुल्या बाजारात तुरीचे भाव वाढले आहेत. तर तुरीला खुल्या बाजारात 6…
शेतकऱ्याच्या मालाची बाजारपेठेत नेहमीच चढ-उतरण होत असते. त्यामुळे कधी नफा तर कधी तोटा शेतकऱ्याला होत असतो. असेच काही रेशीम कोशाचे देखील काही दिवस चालले होते. तब्ब्ल सात वर्षांनी रेशीम कोशाचे भाव वाढले असून उत्पादक शेतकरी मालामाल झाले आहेत. यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दोन वर्षात शेतकरी ‘रेशीम’ शेतीकडे वळले आणि कोरोना काळातील लॉकडाउनमुळे भाव अत्यंत उतरले. यामुळे अनेकांनी या व्यवसायाकडे पाठ फिरवली. पण जे शेतकरी या प्रतिकूल परिस्थितीत देखील रेशीम शेतीत तग धरून राहिले त्यांना आज चांगले दिवस आले आहेत तब्बल 7 वर्षांनी रेशीम कोसचे भाव वाढल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत. रेशीम विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या बाजारपेठा पैकी…
गेल्या दोन वर्षापासून महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न रखडलेला होता.तो आता मार्च महिन्याच्या आखेरी मिटणार आहे. ठाकरे सरकारने सत्तेत येताच शेतकऱ्यांसाठी २ लाखांपर्यंत कर्जमाफी करणार असल्याची घोषणा केली. त्यात राज्यातील तब्बल 31 लाख 73 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त 20 हजार 250 कोटींचा भार देखील पडला होता. मात्र, त्यानंतर कोरोनाच्या प्रदुर्भावामुळे उर्वरीत रक्कम 54 हजार शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी रखडली होती. तर सध्या उर्वरीत शेतकऱ्यांसाठी तब्बल 54 हजार 200 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आसून. त्यामुळे या महिन्या अखेरीस 54 हजार शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हा कमी होणार…
देशात सध्या रशिया-युक्रेन युद्धामुळे खताचा तुटवडा जाणू लागला आहे. तर शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची गरज भागवण्यासाठी देशातील रासायनिक खत उत्पादक कंपन्या आपले उत्पादन वाढवणार आहे. , रासायनिक खतांच्या तुटवड्याचा परिणाम हा जरी शेती उत्पादनावर होणारा असला तरी, त्याचा अतिरिक्त वापरावरही विचार व्हायला हवा. यासाठी कृषी विभागाकडून रासायनिक खतांचा अतिवापर कमी करून रासायनिक खतांना सेंद्रिय खताची जोड दिल्यास उत्पादनही वाढून जमिनीचा पोत देखील सुधारण्यास मदत होणार आहे. शेतकरी हा खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन जास्त मिळवण्यासाठी खरिपातील कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांसाठी रासायनिक खताचा अधिकचा वापर करतात.असे आता कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे.तरी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीचा वापर वाढवावा यासाठी कृषी…
Sarkari Yojana: अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली.या योजनेचा गैरफायदाही अनेकांनी घेतल्याचे माहिती दरम्यान समोर आले. तर या योजनेत अपात्र शेतकऱ्यांकडून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेताना काही अटी घालण्यात आल्या होत्या. यामध्ये जे आयकर अदा करतात किंवा शासकीय नौकरदार आहेत, त्यांना याचा लाभ घेता येत नव्हता.तरी ही त्यानी या योजनेचा लाभ घेतला.तर अशा शेतकऱ्यांनी ही रक्कम परत करायची आहे. पैसे परत देण्यासाठी अनेकांना वेगळे वाटत असले तर अशा व्यक्तींना आता पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरुनही परतावा करता येणार आहे. त्यामुळे तुमचे नावही गुपित राखले जाणार आहे. आणि सरकारचा उद्देशही साध्य होणार आहे.आता…
krushimarathi : राज्यातील कापसाला गेल्या काही दिवसापासून उच्चांकी दर मिळत आसून फरदड कापसालाही चांगला भाव मिळत आहे. तर कापसाच्या वाढलेल्या भावाचा फायदा शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाला ही होत आहे. कापसाचे वाढलेली उच्चांकी दर यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण सध्या वाढलेली मागणी आणि घटलेला पुरवठा यामुळेच हे शक्य झाले आहे.तर शेतकऱ्यांनी वाढलेल्या भावामुळे अखेरच्या टप्प्यातील साठवलेला कापूस विकला आणि आता त्याचाच फायदा व्यापाऱ्यांना झाला. यंदा सोयाबीनला वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला जास्त पसंती दिली त्यामुळे कापसाचे क्षेत्र कमी होऊन उत्पादन घटले आणि उत्पादन घटल्यामुळे मागणी वाढली परिणामी कापसाला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. अकोट बाजार समितीमध्ये जे गेल्या 50 वर्षामध्ये झाले…