krushi marathi :-शेतकऱ्यांचा खरीप हंगामातील बियाण्यांचा प्रश्न यंदा मिटला आहे. पण हंगामातील लागणाऱ्या रासायनिक खताचे काय? तर यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. रासायनिक खताचा पुरवठा व्यवस्थित व्हावा तसेच टंचाई निर्माण होऊ नये व साठे बाजारावर आता भरारी पथकाची नजर असणार आहे. त्यासाठी राज्यात तालुकानिहाय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्यामागील कारण म्हणजे रशिया-युक्रेन या दोन्ही देशात युद्ध जन्य परिस्थितीमुळे भारताला लागणाऱ्या खाताचा पुरवठा अद्यापही झालेला नाही. भारतात रासायनिक खतासाठी लागणारा कच्चामाल हा रशियातून मागवला जातो. त्याची आयात या वर्षी झालेली नसल्यामुळे देशासमोर रासायनिक खताचे मोठे संकट उभे राहण्याची सध्या चिन्हे दिसत आहेत. तर प्रशासनाकडून…
Author: Krushi Marathi
अधिकचे उत्पादन घेण्यासाठी शेती ही जास्त असलीच पाहिजे असे काही नाही. तर कमी शेतीतून सुद्धा योग्य नियोजन केल्यास लाखो रुपयांचे उत्पादन घेता येऊ शकते. हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा येथील शेतकरी पंकज आडकिने यांनी. जरबेराच्या दहा गुंठे फूल शेतीमधून वर्षाकाठी सात लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत.शेतात नवनवीन प्रयोग करून त्याला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतीतून भरघोस उत्पादनासह अधिकचा नफा मिळवता येऊ शकतो. काही शेतकरी शेती परवडत नाही म्हणून हाताश होतात.तर शेती पिकाचे योग्य नियोजन केल्यास सहज नफा मिळवता येऊ शकतो. शेतकरी पंकज आडकिने यांनी आपल्या 10 गुंठे शेतात हे करून दाखवले आहे. पंकज अडकिने यांनी फुलशेतीचे प्रशिक्षण पुणे येथून घेतले. त्यांनी फुल शेतीचे…
सध्या रासायनिक खतांच्या वाढत्या दुष्परिणामांमुळे सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.तर सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये मदत देणार आहे. सेंद्रिय शेतीसाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जाणार असून उत्पादन वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीसाठी प्रोत्साहनही दिले जाणार आहे. दिवसेंदिवस रासायनिक खतांचा उत्पादन वाढीसाठी अतिरिक्त वापर होत असल्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आसून सेंद्रिय शेतीसाठी दोन योजना राबविल्या जाणार आहेत.असे केंद्रीय कृषी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी लोकसभेत बोलताना सांगितले आहे. यामध्ये पारंपरिक कृषी योजनात आणि ईशान्य भागातील शेतकऱ्यांसाठी मिशन ऑर्गेनिक व्हॅल्यू…
भारतात खरीप हंगामात खताला सर्वाधिक मागणी असते.तर यंदाच्या वर्षी रशियातील युद्धजन्य परिस्थिती मुळे खताची आणि कच्च्या मालाची आवकच झालेली नाही. त्यामुळे हंगामात खत टंचाई निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांना खत टंचाईची अधिक झळ बसू नये कृषी विभागाकडून नियोजन करण्यात येणार आहे. ओढावलेली परस्थिती लक्षात घेता उपलब्ध साठ्याचा योग्य वापर आणि खत विक्रीचे नियम या अनुशंगाने कृषी अधिकाऱ्यांकडून बैठका घेण्यात येत आहेत. त्यात रासायनिक खत विक्रेत्यांना आधार कार्ड धारक शेतकऱ्यांना ई-पॉस मशीनद्वारेच खताची विक्री करावी लागणार आहे. शिवाय एमआरपी पेक्षा जास्त किमतीने खताची विक्री केल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खतांची खरेदी ही शेतकऱ्यांनी…
शेतकऱ्यांना कधी कोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल हे निश्चित सांगता येत नाही. कधी नैसर्गिक सृष्टिचक्र, तर कधी सरकारी योजना त्यात सरकारच्या अनेक चुकीच्या धोरणामुळे त्याचा सर्वाधिक फटका शेतकर्यांना बसत आहे. तर आताच सरकारने मुक्त तूर आयातीला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तर त्यामुळे देशांतर्गत तुरीच्या दरावर त्याचा परिणाम दिसून येणार आहे. यामुळे तूर उत्पादन शेतकरी आर्थिक फटका नक्कीच बसणार असल्याचे चित्र ह्या निर्णयामुळे तयार झाले आहे. आतापर्यंत सरकारने सोयाबीन, हरभरा व तुर यांच्या बाबतीत सरकारने कोणताही हस्तक्षेप केला नव्हता. त्यामुळे सोयाबीन, हरभऱ्याला विक्रमी दर मिळाले होते.यामुळे शेतकरी काहीसे आनंदीत होते. पण आता सरकारच्या एका निर्णयामुळे शेतकरी निराश झाले आहे. आयातीची मुदत ही…
गेले काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून वाढत्या तापमानाचा परिणाम हा मुक्या जनावरांच्या जीवावर सुद्धा बेतू लागला आहे. बारामती तालुक्यात उष्मघातामुळे तीन शेळ्या एकाच दिवशी दगावल्या आहेत. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाची तीव्रता वाढली आहे.वाढत्या उन्हाचा परिणाम हा पिकांवर सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात देखील घट होणार आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढलेला आहे. तर त्यामुळे बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील शेतकऱ्यांच्या तीन शेळ्या उष्माघाताने दगावल्या आहेत. तर शेळ्यांची उन्हाळ्यात काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी उन्हाळ्यात 11 ते 4 या काळात भरपूर ऊन असते. उन्हामुळे शेळ्यांमध्ये उष्माघाताचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे चारून आल्यानंतर शेळ्यांना सावलीतच बांधणे गरजेचे…
कोकणच्या हापूस आंब्याला देशातच नव्हे तर देशाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते. हापूस आंब्याची चव चाखण्याची भुरळ अनेकांच्या मनात असते. तर आता अमेरिकापाठोपाठ जपान मधील नागरिकांनाही हापूस खाण्याचा मोह आवरत नाही. म्हणून आंब्याच्या मागणीत वाढ होत आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक हापूस आंब्याचे उत्पादन घेतले जाते.त्याच बरोबर गुजरातमधील जुनागढ येथे देखील आंब्याची उत्पादन घेतले जाते. जपानमध्ये निर्यात करण्यात येणाऱ्या आंब्याची अॅग्रीकल्चरल अँड प्रोसेस्ड फूड प्रॉडक्टस् एक्स्पोर्ट डेव्हलपमेंट अॅथॉरिटीने (अपेडा) मुंबईहून हापुस आणि केशर आंब्याची निर्यात केली जात आहे. दरवर्षी देशातून 400 कोटी रुपयांचा आंबा निर्यातीसाठी पाठवला जातो. यामध्ये देशातून सर्वाधिक आंब्याची निर्यात ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये होते. त्याच बरोबर अमेरिका, इंग्लंड, सौदी अरेबिया,…
krushimarathi: कापसाच्या लागवडीवरुन कापसाच्या उत्पादन किती होईल याचा अंदाज बांधला जातो.तर ह्यासाठी उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने कापसाची विक्री करावी की साठवणूक शेतकऱ्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. भारताचा कापूस उत्पादनात जगात पहिल्या क्रमांक लागतो.पण कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्री साठवणूक याबाबत आडचणी निर्माण होत आहे. तर उत्पादकता नोंदवणारी यंत्रणाच नसल्याने यंदाच्या वर्षी उत्पादन घटून देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसानच झाले आहे. कापसाच्या दरातील चढ-उतार याबाबत शेतकऱ्यांना माहिती होत नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या विक्री बद्दल कोणताही अंदाज बांधता येत नाही. कापूस उत्पादनाचे क्षेत्र समोर आले की त्यानुसार उत्पादकता ठरवली जाते.यंदा कापूस काढणीच्या अंतिम टप्प्यात बोंडअळी आणि बोंडसडचा…
देशात सध्या रब्बी हंगामातील गव्हाची काढणी पूर्ण झाली असून खरेदी केंद्रावर गव्हाची आवक वाढली आहे. त्याचा परिणाम हा गव्हाच्या दरावर होऊन गव्हाचे दर घसरले आहेत. पण केंद्र सरकारने गव्हाला हमीभाव देऊन गहू खरेदी करून घेण्यासाठी भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) यासंबधीचा आराखडा तयार केला आसून 1 एप्रिलपासून त्या नुसार गव्हाची खरेदी करण्यात येणार आहे. तर सरकारने पंजाबला गहू खरेदीसाठी सर्वाधिक कोटा दिला आसून यंदाच्या हंगामात 444 लाख मेट्रीक टन गव्हाची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट राहणार आहे. पंजाब मध्ये गव्हाचे उत्पादन हे सर्वाधिक होत असल्यामुळे सरकारने पंजाब मधीन गव्हाला हामीभावाने खरेदी करण्यासाठी सर्वाधीक कोटा पंजाबला दिला आहे.तर यंदाही सर्वाधिक म्हणजेच 132…
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रब्बी हंगामासाठी (Kharip & Rabbi Season) सुमारे चार हजार दोनशे कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसं बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर हा जिल्हा रब्बी हंगामात सर्वाधिक पिकांची लागवड करत असतो मात्र असे असतानाही या जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कर्जाची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. याच गोष्टीचा विचार करता यंदा खरीप व रब्बी हंगामासाठी समान स्वरूपात कर्जाचे वाटप केले जाणार आहे. सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रातील हा जिल्हा सर्वाधिक साखर कारखाने (Most sugar factories) असण्याचा मान आपल्या…