Aurangabad New Expressway : गेल्या काही दशकांमध्ये भारताची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या जगात भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे. भारताने नुकतेच चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकले आहे. मात्र जसजशी देशाची लोकसंख्या वाढू लागली आहे तसतसे देशातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण येत आहे.
महामार्गांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कॉमन बनत चालली आहे. दरम्यान वाहतूक कोंडीची ही समस्या निकाली काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मोठ-मोठे महामार्ग विकसित केले जात आहेत. आपल्या राज्यातही विविध महामार्गाची कामे प्रगतीपथावर आहेत.
खरंतर कोणत्याही विकसित देशात किंवा प्रदेशात तेथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावत असते. यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील विशेष प्रयत्न केले आहेत.
भारतमाला परीयोजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात महामार्गाचे जाळे विकसित केले जात आहे. भारतमाला परियोजनेतर्गत जवळपास तीन हजार किलोमीटर लांबीचे ग्रीनफिल्ड महामार्ग तयार केले जाणार आहेत. या परियोजनेअंतर्गत आपल्या राज्यातही काही महामार्गांची कामे सुरू आहेत.
सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाचा देखील यामध्ये समावेश होतो. हा मार्ग आपल्या राज्याच्या एकात्मिक विकासासाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये देखील वेगवेगळ्या महामार्गांचे कामे हाती घेण्यात आले आहेत.
यामध्ये बिहार येथील औरंगाबाद ते उत्तर प्रदेश येथील वाराणसी दरम्यान देखील एक महामार्ग विकसित केला जात आहे. दरम्यान या औरंगाबाद ते काशी या महामार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. ते म्हणजे हा सहा पदरी महामार्ग लवकरच बांधून पूर्ण होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच हा महामार्ग जानेवारी 2024 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे काशी ते औरंगाबाद दरम्यान चा प्रवास जानेवारी महिन्यात सुपरफास्ट होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
कसा आहे महामार्ग
हा एक राष्ट्रीय महामार्ग राहणार आहे. या महामार्गाचे 192.4 किलोमीटर एवढी लांबी असेल. या महामार्गासाठी 2848 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या मार्गामुळे बिहार येथील औरंगाबाद ते काशी हा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. हा महामार्ग बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पाच जिल्ह्यांना कनेक्ट करणार आहे.
NHAI अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये या महामार्गाची एकूण लांबी 56 किलोमीटर एवढी राहणार आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये या महामार्गाचे आत्तापर्यंत 50 किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 10 किलोमीटर रस्त्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण होणार आहे.
वाराणसी ते औरंगाबाद दरम्यान तयार होणारा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 19 म्हणून ओळखला जाणार आहे. हा मार्ग वाराणसी, चंदौली, कैमूर, रोहतास आणि सासाराम या जिल्ह्यांना जोडण्याचे काम करणार आहे. या सहा पदरी रस्त्याच्या कामामुळे वाहतूककोंडीची समस्या सुटणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवास जलद आणि अधिक आरामदायी होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.