आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ हिंदुस्थानात ! ‘या’ ठिकाणी 1,000 एकर जमिनीवर तयार होणार भव्य विमानतळ, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Asia Biggest Airport : भारत हा सर्वात वेगाने विकसित होत असलेला देश आहे. आपल्या देशाची वेगाने विकसनशील देशाकडून विकसित देशाकडे वाटचाल सुरू आहे. भारताची अर्थव्यवस्था आता जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. विशेष म्हणजे येणारे दशक हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी पोषक ठरणार आहे.

अनेक अर्थतज्ज्ञांनी येत्या दशकात भारताची अर्थव्यवस्था ही पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा आशावाद व्यक्त केला आहे. जगातील नामांकित संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेला सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असल्याचे सांगितले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तथापि, देशाची अर्थव्यवस्था आणखी सक्षम बनवण्यासाठी आणि महासत्ता बनण्याचे आपले स्वप्न लवकरात लवकर सत्यात उतरवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून देशभरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. ज्या देशाची पायाभूत सुविधा मजबूत असते त्या देशाचा विकास अधिक जलद गतीने होतो.

विकसित देशांमध्ये तेथील पायाभूत सुविधा महत्त्वाची भूमिका बजावत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जात आहे.

शिक्षण, उद्योग, कृषी, पर्यटन इत्यादीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा विशेषतः दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक मजबूत केली जात आहे.

याव्यतिरिक्त विमान वाहतूक देखील मजबूत करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान देशातील विमान वाहतूक सुधारण्यासाठी आता आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ आपल्या भारतात विकसित होणार आहे. एक हजार एकर क्षेत्रावर हे आशिया खंडातील सर्वात मोठे विमानतळ तयार होणार आहे.

हे विमानतळ उत्तर प्रदेश मध्ये विकसित केले जाणार असून यामुळे उत्तर प्रदेश सहित संपूर्ण देशाचा विकास सुनिश्चित होणार आहे. हे विमानतळ तयार करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार प्रयत्नशील असून लवकरच या विमानतळाला मूर्त रूप दिले जाणार आहे.

हे विमानतळ राज्यातील प्रमुख द्रुतगती महामार्ग सोबत कनेक्ट केले जाणार आहे. उत्तर प्रदेश मध्ये विकसित होणारे हे विमानतळ नोएडा विमानतळ म्हणून ओळखले जाईल अशी माहिती समोर आली आहे.

हे विमानतळ 2024 पर्यंत पूर्ण होईल आणि त्यानंतर या विमानतळावरून वाहतूक सुरू होणार आहे. हा विमानतळाचा प्रकल्प केंद्रातील मोदी सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राहणार आहे. यामुळे या विमानतळाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.

निश्चितच हे विमानतळ देशाच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. कृषी, उद्योग, शिक्षण यांसारख्या क्षेत्राला देखील या विमानतळाचा फायदा होणार आहे.