Soybean Rate Hike : सोयाबीनची संपूर्ण राज्यभर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीनची लागवड पाहायला मिळते.
खरे तर सोयाबीनला नगदी पिकाचा दर्जा मिळाला आहे. या कॅश क्रॉप मधून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन मिळते शिवाय तेलबिया पीक असल्याने बाजारात चांगला दर मिळतो यामुळे सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
पण गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे विदारक वास्तव पाहायला मिळाले आहे. याचे कारण म्हणजे सोयाबीनच्या एकरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. याशिवाय सोयाबीनला बाजारात अपेक्षित भावही मिळत नाहीये.
गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला बाजार समितीमध्ये चांगला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आले आहेत. डिसेंबर 2023 मध्ये पिवळं सोनं म्हणून ओळखले जाणार सोयाबीन बाजारात ४२०० रुपये प्रति क्विंटल ते 5400 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विकले जात होते.
मात्र सध्या स्थितीला सोयाबीनला अवघा चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल ते ४७०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळतोय. सांगली एपीएमसी मध्ये काला अर्थातच 11 मे रोजी झालेल्या लिलावात सोयाबीनला सर्वाधिक 4700 एवढा भाव मिळाला आहे.
विशेष म्हणजे हा कमाल बाजार भाव गेल्या दोन महिन्यातील सर्वोच्च भाव ठरला आहे. बाजार भावात काहीशी सुधारणा झाली असल्याने आगामी काळातही भाव वाढणार का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित होत आहे.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाच्या किमतीत पाच रुपयांपासून ते बारा रुपये प्रति किलो पर्यंतची वाढ पाहायला मिळाली आहे. याचा परिणाम म्हणून काल बाजारभावात थोडीशी सुधारणा झाली.
सोयाबीन, शेंगदाणा, करडई आणि सूर्यफूल अशा विविध खाद्यतेलांच्या किमती वाढल्या असल्याने आगामी काळात देखील सोयाबीन बाजार भावात सुधारणा होऊ शकते असा अंदाज आता व्यक्त होत आहे.
जर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक कमी झाली तर मे अखेरपर्यंत सोयाबीनला 5400 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर मिळू शकतो असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तथापि, सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी आपल्या गरजेनुसार आणि बाजारातील समीकरणांचा आढावा घेऊन विक्रीचे नियोजन करणे त्यांच्यासाठी कधीही फायद्याचे ठरणार आहे.