चर्चा तर होणारच ! उत्तर महाराष्ट्रात बहरले जम्मू काश्मीरच सफरचंद, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Apple Farming In Maharashtra : सफरचंद म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे सर्वप्रथम उभे राहते ते जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे चित्र. सफरचंद पिकाला थंड हवामान मानवते. या दोन्ही राज्यात थंड हवामान असल्याने या राज्यात सफरचंद पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र आता या दोन राज्याची सफरचंद उत्पादनात असलेली मक्तेदारी लवकरच संपुष्टात येणार असे चित्र तयार होत आहे.

कारण की, सफरचंद हे पीक देशातील इतरही भागात उत्पादित होऊ लागले आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील सफरचंद लागवडीचे प्रयोग पाहायला मिळत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील बीड, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात सफरचंद लागवडीचे प्रयोग पाहायला मिळाले आहेत. आता उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी येथील कृषी महाविद्यालयानेही सफरचंद शेती यशस्वी करून दाखवली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

उत्तर महाराष्ट्राच्या नासिक जिल्ह्यातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या दुलाजी पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीने दिंडोरीतील चाचडगाव येथे यशस्वी सफरचंद लागवड करण्यात आली आहे. सफरचंदच्या हरमन 99 या काश्मिरी सफरचंद प्रजातीची लागवड महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आली. ही लागवड आता यशस्वी झाली असल्याने उत्तर महाराष्ट्रात देखील सफरचंद शेती होऊ शकते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

यामुळे सध्या या प्रयोगाच्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मधील सफरचंद उत्तर महाराष्ट्रात देखील उत्पादित होऊ शकते हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्रात देखील सफरचंद पीक उत्पादित होऊ शकते आता हे सिद्ध झाले असल्याने भविष्यात आपल्या राज्यात सफरचंद लागवड वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

खरंतर सफरचंद पिकाला बाजारात चांगला भाव मिळतो यामुळे या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकते. सफरचंद हे विषम हवामानात वाढणारे पीक आहे. या पिकाची मध्यम भारी काळ्या जमिनीत तसेच मध्यम हलक्या जमिनीत देखील लागवड होऊ शकते. मात्र यासाठी शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचा सल्ला घेणे जरुरीचे राहणार आहे.