दुभत्या जनावरांना ‘हे’ पदार्थ खाऊ घाला, काही दिवसांतच जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढणार, तज्ञांची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Animal Husbandry : भारतात शेती सोबतच पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. पशुपालन हा व्यवसाय प्रामुख्याने दुधासाठी होतो. अलीकडे मात्र दुधाचा धंदा शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. एक तर भारतात महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या महागाईमुळे डेरी फार्मिंगचा खर्च वाढला आहे.

पशुधनाच्या किमती वाढल्या आहेत. पशु चाऱ्याच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय इंधन दरवाढ, मजुरीचे वाढलेले दर आणि दुधाचे कमी होत असलेले भाव या सर्व पार्श्वभूमीवर दुधाचा व्यवसाय आता परवडत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडे जनावरांची दूध उत्पादन क्षमता देखील कमी होऊ लागली आहे. यामुळे अनेकांच्या माध्यमातून दुभत्या जनावरांना काय खायला दिले पाहिजे जेणेकरून त्यांची दूध देण्याची क्षमता वाढेल हा प्रश्न उपस्थित केला जात होतो.

अशा परिस्थितीत आज आपण याबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

दुभत्या जनावरांना हे पदार्थ खाऊ घाला

काही शेतकरी जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढावी यासाठी ब्लॅक मार्केटमध्ये मिळणाऱ्या इंजेक्शनचा वापर करतात. खरे तर असे इंजेक्शन शासनाने बॅन केले आहे. मात्र तरीही छुप्या पद्धतीने काही भागात असे इंजेक्शन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात.

या इंजेक्शनचा वापर केल्याने काही काळ जनावरांची दूध उत्पादनक्षमता वाढते. पण काही दिवसांनी याचा जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

शिवाय इंजेक्शन दिलेल्या जनावरांचे दूध मानवी आरोग्यासाठी देखील अपायकारक असल्याचे मत तज्ञांनी वर्तवले आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी अशा इंजेक्शनचा वापर करू नये त्याऐवजी शेतकऱ्यांनी जनावरांना चांगला पोषक आहार दिला पाहिजे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जर दुभत्या जनावराची दूध उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर त्यांना मुबलक प्रमाणात हिरवा चारा खाऊ घातला पाहिजे.

दान, मेथी आणि गूळ यांना शिजवून हे मिश्रण दुभत्या जनावरांना खाऊ घातल्यास दूध वाढते असा दावा करण्यात आला आहे. एवढेच नाही तर नारळ म्हणजे खोबरे किसून जनावरांना खाऊ घातले तर जनावरांची दूध देण्याची क्षमता वाढू शकते.

चवळीचा चारा हा देखील जनावरांसाठी उत्कृष्ट ठरतो. त्यामुळे सुद्धा दूध उत्पादन क्षमता वाढते. मोहरीची पेंड, सोयाबीन पेंड, इत्यादी ढेप जनावरांना खाऊ घातल्यास दुधाची उत्पादनक्षमता वाढते आणि दुधामध्ये फॅटचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा