Farmer Loan:- शेतकऱ्यांना शेतीच्या विविध कामांकरिता बराच वेळा पैशाची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. सरकारच्या माध्यमातून विविध कृषी योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. शेतकऱ्यांना जी काही आर्थिक समस्या येतात त्या समस्यावर मात करण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार कृषी कर्ज सुलभतेने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे.
आता केंद्र सरकारने तीन लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ केले जाणार असल्याचे सांगितले असून किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जावरही सुविधा लागू असणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार तातडीने पावले उचलत असल्याची माहिती देखील केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेमध्ये दिली.
बँकांना कृषी कर्जावर नाही आकारता येणार सेवाशुल्क
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना सांगितले की, शेतकऱ्यांना शेतीमधील कामांमध्ये आर्थिक मदत व्हावी याकरिता सरकार अनेक बदल करत आहे. सरकारच्या वित्तीय सेवा विभागाने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या अडचणी आणि आर्थिक संकट लक्षात घेऊन किसान क्रेडिट कार्ड कर्ज किंवा पीक कर्जा करिता सेटलमेंट, दस्तऐवज, सर्वेक्षण, अकाउंट बुक फ्री आणि इतर प्रकारच्या सेवांसह सर्व आवश्यक सेवा दिल्या असून तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्जाचे सेवा शुल्क माफ करण्यास देखील सांगितले आहे.
एवढेच नाही तर रिझर्व बँकेने हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक लाख रुपयांवरून 1.6 लाख रुपये केली आहे. एवढेच नाही तर बँका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या कर्ज मूल्यांकन प्रक्रियेत एक किंवा अधिक क्रेडिट माहिती कंपन्यांकडून क्रेडिट माहिती अहवाल मिळवण्यासाठी कर्ज धोरणांमध्ये योग्य तरतुदी समाविष्ट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे सिस्टम मध्ये उपलब्ध माहितीच्या आधारावर आता कर्जासंबंधीचे योग्य निर्णय बँकांना घेता येणार आहे.
जमिनीचे क्षेत्र आणि पेरणी केलेल्या पिकांवर आता कर्जाची सुविधा
केंद्र सरकारची किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकरी, शेतकरी भागीदार इत्यादीं सह विविध श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी कर्जाचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करते. रूपे डेबिट कार्ड केसीसी योजनेअंतर्गत जारी केले जाते व हे कार्ड स्वतः एक ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे. ज्या माध्यमातून मंजूर कर्ज मर्यादेपर्यंत रुपे डेबिट कार्ड द्वारे तुम्हाला पैसे काढता येतात.
एवढेच नाही तर आता पीक कर्जाचे मूल्यांकन जमिनीचे क्षेत्रफळ आणि लागवड केलेल्या पिकाच्या आधारे केले जाते. खराब हवामान इत्यादीमुळे विद्यमान केसीसी कर्जाचे पुनर्निर्धारित केल्यानंतर राज्य सरकार किंवा बँकांच्या निर्णयानुसार आता शेतकऱ्यांना बँकेच्या पात्रता निकषानुसार गरजेनुसार कर्ज घेण्याची परवानगी देखील दिली जाते.