Ajit Pawar News :- सडेतोड आणि बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधपक्ष नेते अजित पवार यांनी आज हवामान खात्यावर फटकेबाजी केली.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस आला नाही, हे सांगताना त्यांचा पारा चांगलाच चढला. आपल्या हवामान विभागाची त्यांनी परदेशातील हवामान विभागांशी तुलना केली.
हे पण वाचा : ‘या’ औषधी वनस्पतीची शेती शेतकऱ्यांना लखपती बनवणार, अर्धा लिटर ज्यूस विकला जातो 1500 रुपयाला
हवामान विभागाने रेड अर्लट दिल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर राज्य सरकारने पावसाचे कारण देत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलल्या आहेत. हेच अजितदादांचा पारा चढण्याचे कारण असावे, असे मानले जात आहे.
पावसाचा एक थेंब पडायला तयार नाही !
पुण्यात बोलताना पवार म्हणाले, ‘हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे अन् पावसाचा एक थेंब पडायला तयार नाही. ज्यावेळी हवामान खातं रेड अलर्ट वगैरे देतं, त्यावेळी त्याची दखल प्रशासन घेतं असतं.
हे पण वाचा : अच्छे दिन इज कमिंग..! मोदी ‘या’ दिवशी देणार 2 हजार, कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
आताचं उदाहरण द्यायचं झालं तर पुणे पिंपरी चिंचवडला पावसाचा इशारा दिला, पण पाऊस मात्र पडला नाही. अंदाजावरूनच जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुट्ट्या दिल्या.
म्हणजे किती नुकसान झाले पहा.परदेशात जर आपण गेलो तर संबंधित दिवशी, संबंधित वेळेला पाऊस पडणार असा इशारा हवामान खातं देत असत.
त्याचवेळी लोकं छत्र्या घेऊन बाहेर पडतात. म्हणजे किती ही अॅक्युरसी असते पहा. आणि आपलं हवामान खातं बघा कसं काम करतंय. मला कुणाचं अवमान नाही करायचा, पण असं असेल कसं चालणार’, असेही पवार म्हणाले.
हे पण वाचा : शेतकरी मित्रांनो लाखों कमवायचे आहेत का? मग 1 लाख खर्च करून गुलाब लागवड करा, 7 लाखाची कमाई होणारं