धक्कादायक ! अहमदनगरहून धावणारी ‘ही’ बहुप्रतिक्षित रेल्वे झाली बंद, कारण काय ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Railway News : अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि तेवढीच धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरतर, भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. रेल्वेचा प्रवास स्वस्तात आणि जलद होत असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वेनेच प्रवास करण्यास प्रवासी पसंती दाखवतात.

विशेष म्हणजे भारतीय रेल्वेचे जाळे हे देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे. यामुळे देशातील कानाकोपऱ्यात वसलेल्या शहरात देखील रेल्वेने प्रवास करता येणे शक्य बनले आहे. मात्र आजही देशातील काही शहरांना रेल्वेची कनेक्टिव्हिटी लाभलेली नाही.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यात गेल्यावर्षीपर्यंत अहमदनगर ते आष्टी दरम्यान देखील रेल्वेची कनेक्टिव्हिटी नव्हती. यामुळे या मार्गावर रेल्वे सुरू करण्याची प्रवाशांची मागणी होती. दरम्यान ही मागणी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पूर्ण झाली. 23 सप्टेंबर 2022 रोजी अहमदनगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावर अहमदनगर ते आष्टी डेमू रेल्वे सुरू झाली.

त्यावेळी याचा मोठा गाजावाजा देखील करण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे संबंधित भागातील प्रवाशांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. अहमदनगर आणि बीड या दोन जिल्ह्यांना जोडणारी ही रेल्वे या भागातील नागरिकांसाठी फायदेशीर ठरणारी होती.

मात्र आता अवघ्या दहा महिन्यांच्या काळातच ही रेल्वे बंद करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, रेल्वेने या गाडीला प्रवाशांचा अत्यंत कमी प्रतिसाद, चालकाची कमतरता आणि अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान विद्युतिकरणाचे काम सुरू असल्याने ही ट्रेन काही कालावधीसाठी रद्द केली आहे.

या रेल्वेच्या दोन्हीकडील फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असून आता ही गाडी 13 ऑक्टोबर पर्यंत रद्द राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. वास्तविक ही गाडी सुरू झाल्यानंतर अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोठा आनंद साजरा केला होता.

रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू केली म्हणून या मार्गावरील रेल्वे प्रवाशांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र आता ही गाडी सुरू होऊन फक्त दहा महिन्यांचा काळ लोटला आणि आता ही गाडी 13 ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे.

या रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाची कामे बाकी असल्याने ही गाडी रद्द करण्याचे कारण रेल्वे प्रशासनाकडून पुढे केले जात असले तरी या मार्गावर रेल्वे प्रवाशांची संख्या कमी असल्याने ही गाडी रद्द झाली असावी असा अंदाज बांधला जात आहे.

निश्चितच, कारण काहीही असो ही ट्रेन रद्द झाल्याने बीडकरांच्या आणि अहमदनगरकरांच्या आनंदावर विरजण पडल आहे एवढे नक्की. दरम्यान आता ही गाडी ऑक्टोबर महिन्यात सुरू होते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.