Ahmednagar Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादकांना या चालू जुलै महिन्यात दरात वाढ झाली असल्याने दिलासा मिळत आहे. वास्तविक, शेतकऱ्यांनी जवळपास पाच ते सहा महिने कांदा अतिशय नगण्य भावात विकला आहे. कांद्याला अवघा दोन ते तीन रुपये आणि चार ते पाच रुपये प्रति किलो असा भाव मिळत होता. यामुळे पिकासाठी आलेला उत्पादन खर्च देखील अनेकांना मिळत नव्हता.
अनेक शेतकऱ्यांना तर वाहतुकीचा खर्च देखील वसूल झाला नाही. एकंदरीत फेब्रुवारी ते जून महिन्याच्या काळात कांदा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसला. अशा स्थितीत दरात वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. किमान पिकासाठी आलेला उत्पादन खर्च काढून पदरी प्रपंच चालवण्यापुरता पैसा यावा अशी इच्छा शेतकऱ्यांची आहे.
अशातच आता जुलै महिन्यात कांदा दरात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांशी बाजारात कांद्याला बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळू लागला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना उत्पादन खर्च काढून थोडाफार पैसा हाताशी राहील अशी आशा वाटू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे चेहरे अगदी पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे खुलले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे. आज नगर जिल्ह्यातील राहता एपीएमसी मध्ये चांगल्या कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी राहता एपीएमसी मध्ये दरात थोडीशी घसरण झाली होती मात्र आता पुन्हा एकदा समाधानकारक बाजार भाव मिळू लागला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, आज अहमदनगर जिल्ह्यातील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9390 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आज आवक झालेल्या कांद्याला तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान 1800 रुपये प्रति क्विंटल एवढ हक्क मालक आणि 1350 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी भाव नमूद करण्यात आला आहे.
तसेच आज राज्यातील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वोच्च भाव मिळाला आहे. आज रामटेक एपीएमसी मध्ये 28 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली होती. या एपीएमसी मध्ये आवक झालेल्या कांद्याला आज दोन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान 2400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल आणि 2200 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर नमूद करण्यात आला आहे.