Ahmednagar Onion Rate : लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजाराचे चित्र पालटले आहे. निवडणुकीआधी आणि निवडणुकीच्या काळात कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील मोठी नाराजी होती. कांदा बाजार भावात झालेली घसरण हा निवडणुकीचा एक मोठा मुद्दा होता. यामुळे सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात ज्या ठिकाणी कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते त्या लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काही मंत्र्यांचा देखील महाराष्ट्रात पराभव झाला आहे. रावसाहेब दानवे हे यातीलचं एक आहेत.
नगर मधील दोन्ही लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या हातातून गेले आहे. नगर दक्षिण मध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजार भावात मोठी सुधारणा झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातही बाजार भाव चांगलेच कडालेले आहेत.
त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील बाजारांमध्ये कांद्याला सध्या कमाल 3100 ते 3200 रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान भाव मिळत आहे. आता आपण नगर जिल्ह्यातील प्रमुख बाजारांमधील कांद्याचे भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.
नगर जिल्ह्यात कांद्याला काय दर मिळत आहे
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती : 28 जूनला झालेल्या लिलावात नगर जिल्ह्यातील या बाजारात एक नंबरला २३०५ ते २९००, दोन नंबर कांद्याला १५०५ ते २३००, तीन नंबरला २०० ते १५००, गोल्टीला १५०० ते २५०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती : 28 जूनला झालेल्या लिलावात या बाजारात कांद्याला विक्रमी भाव मिळाला. त्या दिवशी या मार्केटमध्ये एक नंबरला २७०० ते २९००, दोन नंबरला २४०० ते २६००, तीन नंबर कांद्याला १६०० ते २३००, चार नंबरला १००० ते १५०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
दादा पाटील शेळके बाजार समिती : 29 जून ला झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये एक नंबरला किमान 2550 आणि कमाल 3150, दोन नंबरला किमान १८५० आणि कमाल २५५०, तीन नंबरला किमान १००० तर कमाल १८५०, चार नंबरला किमान ५०० तर कमाल एक हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
इतर बाजारातील दर
टाकळीभान कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक 2860 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. या मार्केटमध्ये कांद्याला किमान 1200 चा भाव मिळाला आहे. राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 28 तारखेला कमाल 3200 आणि किमान 1100 रुपये असा दर मिळाला आहे.