अहमदनगरच्या साखर कारखान्याची कमाल ! तयार होतेय ‘शुगर फ्री साखर’ ; चवीला गोड लागेल, पण शुगर वाढणार नाही, वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : ऊस हे राज्यासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. आपल्या देशातील उसाचे उत्पादन खूपच अधिक आहे. ऊस उत्पादनासोबतच देशात साखरेचे उत्पादन देखील अधिक आहे. दरवर्षी आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात साखरेची निर्यात देखील केली जाते.

साखर हा असा पदार्थ आहे जो की डायबिटीक पेशंटला अजिबातही चालत नाही. साखर खाल्ली की शुगर वाढते. मात्र आता डायबेटिक पेशंटला सुद्धा साखर खाता येणार आहे. त्यांनी आता साखर खाल्ली तरीही त्यांची शुगर वाढणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने डायबिटीक लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

साखर कारखान्याने आता शुगर फ्री साखर बनवण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे साखर कारखान्याने हाती घेतलेल्या या प्रयोगाला काही प्रमाणात यशही मिळाले आहे. हा प्रयोग 50% यशस्वी झाल्याचे साखर कारखान्याकडून सांगितले गेले आहे. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रयोगशाळेतच हा प्रयोग केला जात आहे.

या प्रयोगात कारखान्याला आत्तापर्यंत 50% एवढे यश मिळाले आहे. यामुळे हा प्रयोग यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर डायबेटिक लोकांना देखील साखर खाता येणार आहे. शिवाय ही शुगर फ्री साखर खाल्ल्याने शुगरही वाढणार नाही. ही शुगर फ्री साखर चवीला गोड राहील, पण यामुळे शुगर वाढणार नाही. म्हणजेच ही शुगर फ्री साखर जिभेला गोड लागणार आहे मात्र रक्तातील साखर यामुळे वाढणार नाही.

कशी असेल शुगर फ्री साखर

साखरेला पांढरा रंग यावा म्हणून सल्फर वापरले जाते. पण हे सल्फर मानवी आरोग्यास अपायकारक आहे. यामुळेच शरीरातील साखर वाढते असे बोलले जात आहे. हेच कारण आहे की कारखान्याने सल्फर विरहित साखर बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

रॉ शुगर मध्ये सल्फर नसते, हीच रॉ शुगर आता इथे तयार होणार आहे. ही सल्फर विरहित शुगर फ्री साखर बनवण्यासाठी कारखान्याचा प्रयोगशाळेत तीन शास्त्रज्ञ काम करत आहेत. त्यांना आतापर्यंत 50% यश मिळाले असून लवकरच हा प्रयोग यशस्वी होणार आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा