Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजेच अहमदनगर जिल्हा. सहकार क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा डंका वाचवणारा अहमदनगर जिल्हा आज एका नवीनच विक्रमाने राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. खरं पाहता महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर पासून महा आवास योजनेत अभियान राबवलं जात आहे.
या अभियानाच्या माध्यमातून राज्यात घरकुलांच्या कामांना गती देण्याचा शासनाचा मानस आहे. या अभियानात टप्पे ठरवून त्या टप्प्यावर घरकुलाचे कामे पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्याने या अभियानात राज्यातील इतर जिल्ह्यांना धोबीपछाड दिली आहे. या अभियानात जिल्ह्याची कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या 56 दिवसात जिल्ह्यात विक्रमी पाच हजार बावीस घरकुल कम्प्लीट करण्यास जिल्हा प्रशासनाला यश आला आहे. राज्यात पहिल्या पाच मध्ये एक नंबर अहमदनगर, दोन नंबर धुळे, तीन नंबर नासिक, चौथ्या स्थानी जळगाव आणि पाचव्या स्थानी यवतमाळचा समावेश आहे. म्हणजेच नासिक विभागाचा डंका घरकुल योजनेत वाजत असून अजूनही कामे जोमात सुरू आहेत.
जिल्ह्यात घरकुल योजनेची कामे जोमात सुरू ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरकर यांचा मोठा हात आहे. त्यांनी ग्रामपंचायत आणि जिल्हा विकास यंत्रणेला सोबत घेऊन नोव्हेंबर पासून घरकुलांच्या कामाला मोठी गती प्रदान केली आहे. या अनुषंगाने आत्तापर्यंत जिल्ह्यात पाच हजार 22 घरकुलांचे कामे कम्प्लिट झाले आहेत.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, सुरु न झालेले तसेच सुरू झालेली पण अपूर्ण असलेले कामे पूर्ण करण्यासाठी राज्यात घरकुलांसाठी एक विशेष अभियान राबवले जात आहे. याची सुरुवात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून झाली. या अभियानाच्या अंतर्गत एकूण शंभर दिवसात अपूर्ण घरकुलांची कामे कम्प्लीट करण्याचे टार्गेट ठरवण्यात आले आहे.
म्हणजेच मार्च अखेरपर्यंत हे अभियान चालणार आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याने यामध्ये मोठी गगन भरारी घेतली असून फेब्रुवारी अखेरच या अभियाना अंतर्गत अपूर्ण राहिलेली घरकुलांची कामे पूर्ण करण्याचा मानस जिल्हा परिषदेने बोलून दाखवला आहे. आतापर्यंत या अभियान अंतर्गत जिल्ह्यात पाच हजार बावीस घरकुल कम्प्लिट झाली असून या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण 18,432 घरकुलांची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
निश्चितच महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे काम देखील काहीस मोठच आहे. यामुळे, घरापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही. अहमदनगर जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात घरकुल योजनेला गती लाभली पाहिजे जेणेकरून गरजू व्यक्तींना लवकरात लवकर हक्काच छत मिळेल. दरम्यान आता आपण अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय किती घर पूर्ण झाली आहेत याची यादी जाणून घेऊया.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात ६२०, जामखेड ७१०, कर्जत ५८५, कोपरगाव २३६, नगर १५२, नेवासा ६२५, पारनेर १२४, पाथर्डी ४८३, राहाता २९०, संगमनेर ३५०, शेवगाव २९२, श्रीगोंदा २११ आणि श्रीरामपूर १८८ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत.
त्यामध्ये जामखेड तालुक्यात सर्वाधिक घरकुल कामे पूर्णत्वास गेली असल्याचे चित्र आहे. निश्चितच फेब्रुवारी अखेरपर्यंत अठरा हजाराहून अधिक घरकुल कामे कम्प्लीट करण्याच टार्गेट पाहता अशी गती अपेक्षित आहे.