Ahmednagar Farmer News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून आहे. हेच कारण आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य शासनाकडूनही विशेष प्रयत्न केले जात आहेत.
शेतकऱ्यांना शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, परदेशात कशी शेती केली जात आहे, तिथे कोणकोणते आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते, कोण कोणती आधुनिक उपकरणे परदेशात वापरली जात आहेत, इत्यादी बाबींची माहिती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौरा देखील राज्य शासनाकडून आयोजित केला जात आहे.
दरम्यान याच अभ्यास दौऱ्या अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील तीन शेतकरी विदेशवारीवर जाणार आहेत. यासाठी राज्य शासनाकडून सदर शेतकऱ्यांकरीता आर्थिक सहाय्य पुरवले जाणार आहे.
यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने कशी शेती केली जाते, परदेशातील शेती कशी तेथील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे, परदेशात वापरल्या जाणाऱ्या कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्याकडे वापर केला जाऊ शकतो इत्यादी गोष्टी शिकायला मिळणार आहेत.
47 शेतकऱ्यांनी केला होता अर्ज
या अभ्यास दौऱ्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील 47 शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याकडे हे अर्ज सादर केले आहेत.
दरम्यान या सादर झालेल्या अर्जातून तीन शेतकऱ्यांची निवड होणार आहे. मात्र अद्याप अभ्यास दौऱ्यासाठी विदेशात जाण्याची वेळ आणि तारीख निश्चित झालेली नाही.
विशेष म्हणजे कोणत्या देशात हा अभ्यास दौरा राहणार याबाबत देखील अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. परंतु लवकरच या संदर्भात माहिती समोर येणार आहे आणि संबंधित शेतकऱ्यांना याविषयी अवगत केले जाणार आहे.
शासन किती खर्च करणार
मिळालेल्या माहितीनुसार या विदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांकरिता शासनाकडून 50% पर्यंतचा खर्च केला जाणार आहे. मात्र या दौऱ्यासाठी येणारा 50 टक्के खर्च निवड झालेल्या शेतकऱ्यांना स्वतः करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांना किती अनुदान मिळते?
विदेशातील या अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून प्रति शेतकरी एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च केला जातो. म्हणजेच एक लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना मिळते.
विदेशवारीमुळे शेतकऱ्यांना शेतीमधील वेगवेगळी तंत्रज्ञाने समजून घेता येतात. परिणामी हा विदेशातील अभ्यास दौरा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठे सहकार्य लाभते.