शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मोटरसायकलवर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च, शेतातील ‘ही’ महत्वाची कामे करणार, मिळणार 40 Kmpl चं मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Tractor News : देशातील शेती क्षेत्रात गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बदल झाले आहेत. आता शेती व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला आहे. यांत्रिकीकरणाचा देखील शेती व्यवसायात मोठा वापर वाढला आहे. ट्रॅक्टर सारख्या यंत्रांमुळे आता शेती करणे आधीच्या तुलनेत नक्कीच सोपे झाले आहे. पूर्वी शेतीची मशागत करण्यापासून तर शेतमाल बाजारात घेऊन जाईपर्यंत सर्वत्र बैल जोडीचा वापर होत असे.

एवढेच नाही तर मजुर शेतात घेऊन जाण्यासाठी देखील बैल जोडी हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांकडे होता. यामुळे, शेती हा अधिक श्रमाचा व्यवसाय बनला होता. शिवाय शेती कामे करण्यासाठी अधिकचा वेळ खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना अधिक अपेक्षित असे उत्पादन देखील मिळत नव्हते. आता मात्र काळाच्या ओघात शेतीत बदल झाला असून ट्रॅक्टर सारख्या यंत्रांमुळे शेती कामे सोपे झाली आहेत.

मात्र ट्रॅक्टरची खरेदी करणे प्रत्येकचं शेतकऱ्याला जमत नाही. प्रत्येकचं शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती ट्रॅक्टर घेण्यासारखे नसते. अशा परिस्थितीत अल्पभूधारक आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना परवडेल अशा ट्रॅक्टरची मागणी बाजारात मोठी पाहायला मिळत होती. दरम्यान, याच मागणीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर येथील Biketor Agro कंपनीने मोटरसायकलवर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च केला आहे.

पुण्यात पार पडलेल्या किसान मेळाव्यात या मोटरसायकलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचे नुकतेच प्रदर्शन पार पडले असून या प्रदर्शनात या मिनी ट्रॅक्टरची विशेष चर्चा पाहायला मिळाली. पुण्यासह संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांमध्ये या मिनी ट्रॅक्टरची विशेष चर्चा आहे. आता आपण या ट्रॅक्टरच्या विशेषता थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मोटारसायकलवर चालणाऱ्या मिनी ट्रॅक्टरच्या विशेषता  

Biketor Agro या कंपनीने मोटरसायकल वर चालणारा मिनी ट्रॅक्टर तयार केला असून याला आशा Biketor असे नाव देण्यात आले आहे. हा मिनी ट्रॅक्टर शेतकरी बांधव त्यांच्याजवळ असलेली मोटरसायकलला जोडून शेतीची अनेक कामे करू शकणार आहेत. विशेष म्हणजे यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या मोटरसायकलमध्ये कोणतेच मॉडिफिकेशन करावे लागणार नाही.

अर्थातच जेव्हा शेतकऱ्यांना शेतकाम करायची असेल तेव्हा मोटरसायकल या Biketor ला जोडू शकतात आणि शेतीकामे करू शकतात. तसेच जेव्हा शेतकऱ्यांना शेत काम करायचे नसेल तीच मोटरसायकल ते त्यांच्या वैयक्तिक कामांसाठी वापरू शकणार आहेत. यासाठी मात्र 150cc ते 350cc च्या मोटरसायकलचे लागणार आहेत.

100 सीसी ची मोटरसायकल यासाठी चालणार नाही. या बाईकवर चालणाऱ्या मिनी ट्रॅक्टरला हार्वेस्टर, पेरणी यंत्र, स्प्रेअर, ट्रॉली आणि रोटाव्हेटर अशी महत्त्वाची कृषी यंत्रे जोडता येणार आहेत आणि शेती कामे करता येणार आहेत. विशेष म्हणजे हे मिनी ट्रॅक्टर ऑपरेट करणे खूपच सोपे आहे. याला मेंटेनन्स खर्च देखील खूपच कमी लागणार आहे.

या नव्याने लॉन्च झालेल्या यंत्राच्या साह्याने पेरणी, खते, सिंचन, फवारणी, खुरपणी, कापणी आणि वाहतुकीची कामे सहजतेने आणि सुलभतेने पूर्ण होणार आहे. हे ट्रॅक्टर पाचशे किलो पर्यंतचा भार उचलण्यास सक्षम राहणार आहे. कोणत्याही जमिनीत हे ट्रॅक्टर वापरता येणार आहे. या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स हा 300 मिमी एवढा आहे.

ट्रॅक्टरचा कमाल वेग हा दहा ते पंधरा किलोमीटर प्रति तास एवढा असून हे ट्रॅक्टर 45 किलोमीटर प्रति लिटर पर्यंतचे मायलेज देण्यास सक्षम राहणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याच्या केबिनमध्ये दोन पंखे आहेत ज्यामुळे इंजिन थंड ठेवता येणार आहे. यात हेडलाईट आणि सर्च लाईटची सुविधा असल्याने रात्री देखील या ट्रॅक्टरच्या सहाय्याने कामे करता येणार आहेत. हिवाळ्यात पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील या ट्रॅक्टरने शेतीकामे करणे सोयीचे होणार आहे.

किंमत किती

हा मोटरसायकल वर चालणारा ट्रॅक्टर सध्या स्थितीला महाराष्ट्रातील काही प्रमुख जिल्ह्यात उपलब्ध आहे. पुणे, नाशिक,औरंगाबाद, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यात हा ट्रॅक्टर उपलब्ध असून या ट्रॅक्टरची किंमत ही अडीच लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दरम्यान हा मिनी ट्रॅक्टर तयार करण्यासाठी सदर कंपनीने तीन वर्ष अहोरात्र मेहनत घेतली आहे. पण आज हा ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध झाला असल्याने या मेहनतीचे चीज झाले आहे. या ट्रॅक्टरमुळे अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीकामे करणे खर्च खूपच सोयीचे होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात शेतीची कामे करता येणार आहेत. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा