Agriculture Scheme : तुम्हीही पीएम किसान योजनेचे तसेच नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहात का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही 2019 मध्ये सुरू झालेली एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे. ही योजना केंद्रातील मोदी सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेचा देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मिळत आहे. या योजनेची लोकप्रियता एवढी अधिक आहे की अनेक राज्यांमधील राज्य सरकारांनी या योजनेच्या धर्तीवर नवीन योजना राबण्यास सुरुवात केली आहे. त्यात आपल्या महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश होतो.
वर्तमान शिंदे सरकारने केंद्रातील पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही नवीन योजना सुरू केली आहे. म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचा लाभ दिला जात आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात. हे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वितरित होतात. दर चार महिन्यांनी एक हप्ता दिला जातो. आतापर्यंत पीएम किसान योजनेअंतर्गत 16 हप्ते मिळालेले आहेत.
नमो शेतकरी योजनेबाबत बोलायचं झालं तर या योजनेचे स्वरूप पीएम किसान सारखेच आहे. नमो शेतकरी अंतर्गत देखील दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा एक हप्ता मिळतो.
या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण तीन हफ्ते दिले गेले आहेत. अशातच मात्र पीएम किसान योजनेचा पुढील सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील चौथा हप्ता एकत्रितरीत्या जमा होणार का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
पीएम किसानचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरी चा चौथा हप्ता सोबतच मिळणार का ?
जसं की आपणास ठाऊकच आहे की, पीएम किसानचा मागील सोळावा हप्ता आणि नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता सोबत दिला गेला होता. यवतमाळ येथे आयोजित एका कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे चार हजार असे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले होते.
त्यामुळे आता पीएम किसानचा सतरावा हप्ता आणि नमो शेतकरीचा चौथा हफ्ता देखील सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार का हा मोठा सवाल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मागील वेळी पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता सोबतच जमा झाला असल्याने पुढील हफ्त्याच्या वेळी देखील या दोन्ही योजनांचे हप्ते सोबतच जमा होतील असे म्हटले जात आहे.
केव्हा जमा होणार हफ्ता ?
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पीएम किसानचा सतरावा हडिया रिपोप्ताआणि नमो शेतकरीचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असा दावा काही मीर्ट मध्ये होत आहे.
याबाबत केंद्र शासनाच्या माध्यमातून तथा राज्य शासनाच्या माध्यमातून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतात असे बोलले जात आहे.