Agriculture Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचे हित जोपासले जावे यासाठी राज्यात अनेक कौतुकास्पद योजना सुरू आहेत. अशातच राज्यातील वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आता स्ट्रॉबेरी या फळ पिकाच्या लागवडीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
खरे तर स्ट्रॉबेरी हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे फळ पीक आहे. याची लागवड राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
राज्यातील सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने जिल्ह्यातील महाबळेश्वर व आजूबाजूच्या परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या बाबतीत देशात महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक लागतो.
मात्र असे असले तरी या पिकाच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला भांडवल लागते. मोठ्या प्रमाणात या पिकाच्या लागवडीसाठी पैसा खर्च करावा लागत असल्याने अनेकांना इच्छा असतानाही या पिकाची शेती सुरू करता येत नाही.
हेच कारण आहे की आता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुदान पुरवले जाणार आहे.
स्ट्रॉबेरी पिक लागवडीसाठी राज्य शासनाकडून अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे आयोजित स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.
विशेष बाब अशी की, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण राज्यात स्ट्रॉबेरी लागवडीला चालना मिळावी यासाठी तसेच शेतकऱ्यांना अधिक क्षमतेने व गुणवत्ता पूर्ण स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता यावे यासाठी लवकरच अनुदान योजना राबवली जाईल असे म्हटले आहे.
यासाठी सर्व घटकांशी लवकरात लवकर चर्चा केली जाईल आणि स्ट्रॉबेरी अनुदान योजनेला अंतिम स्वरूप दिले जाईल असे देखील त्यांनी म्हटले आहे. यामुळे महाराष्ट्रात लवकरच स्ट्रॉबेरी अनुदान योजना सुरू होईल अशी आशा व्यक्त होत आहे.