शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! 3.50 लाखाचा सोलर कृषीपंप मिळणार फक्त 12 हजारात, अर्ज भरणा झाला सुरु, कुठं करणार अर्ज ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Scheme : गेल्या काही वर्षांमध्ये शेतीचा व्यवसाय मोठा आव्हानात्मक बनला आहे. वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांमुळे आता शेती परवडत नाहीये. त्यामुळे शेतकरी बांधव कर्जबाजारी होत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास आठ दशकांचा काळ पूर्ण होणार आहे. मात्र तरीही देशातील अनेक भागात आजही शेतीसाठी वीज उपलब्ध होत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळते.

विजेंमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत सोन्यासारखे पीक वाया जाते. अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक पाणी असूनही वाया जाते यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय शेतकऱ्यांवर मानसिक दडपण सुद्धा येते. यामुळे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अलीकडे शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

हेच कारण आहे की, राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत विजेची उपलब्धता व्हावी यासाठी सौर कृषी पंप वापरण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी केंद्राने एक कौतुकास्पद योजना देखील सुरू केली आहे.

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांना सोलर सौर कृषी पंप वितरित करण्यासाठी पंतप्रधान कुसुम योजना अर्थातच पीएम कुसुम योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात महा कृषी ऊर्जा अभियान राबवले जात आहे.

प्रधानमंत्री कुसूम – ब योजना अर्थातच पीएम कुसुम योजनेचा दुसरा टप्पा सध्या राज्य शासनामार्फत राबवला जात आहे. दरम्यान यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना अधिका-अधिक अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध होत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत वीज उपलब्ध होत असून सिंचनाची सोय होत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तब्बल 90 ते 95 टक्के एवढे अनुदान मिळत आहे. तर उर्वरित पाच ते दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून भरावी लागते.

किती एचपीचे सौर कृषी पंप मिळतात ?

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 एचपी, 5 एचपी आणि 7 एचपीचे सौर कृषी पंप दिले जात आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास 1 लाख 4 हजार 823 सौर कृषिपंप बसवण्यासाठी मान्यता दिलेली आहे. विशेष म्हणजे यासाठी शासनाच्या माध्यमातून लोकसंख्येच्या आधारावर जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत महाराष्ट्रात महाऊर्जामार्फत सुमारे 77 हजार 778 सौर कृषिपंप बसवले गेले आहेत. दरम्यान दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महाऊर्जाच्या माध्यमातून आता कंबर कसण्यात आली आहे. यासाठी या योजनेचा दुसरा टप्पा आता राबवला जाणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान

या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना 95 टक्के एवढ अनुदान मिळते. म्हणजेच या प्रवर्गातील शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळवण्यासाठी पाच टक्के शेतकरी हिस्सा भरावा लागतो. तर उर्वरित खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 90 टक्के एवढे अनुदान दिले जाते आणि उर्वरित दहा टक्के हिस्सा हा शेतकऱ्यांना स्वतः वहन करावा लागतो.

अर्ज कुठे करणार

https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येऊ शकतो. या योजनेचा दुसरा टप्पा राज्यात नुकताच सुरू झाला आहे. त्यामुळे सौर कृषी पंपाचा लाभ मिळवण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा