दुसऱ्याच्या शेतातील पाण्यामुळे तुमचे पीक व माती वाहून जात असेल तर काय कराल ? तज्ञ सांगतात की….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेतीवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय हा खूपच आव्हानात्मक बनला आहे. नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

परिस्थिती एवढी बिकट बनत चालले आहे की आता नवयुवक शेतकरी पुत्र शेती व्यवसायापासून दुरावत आहेत. शेतीमध्ये सातत्याने अधिकचा उत्पादन खर्च करावा लागत असल्याने आणि खूपच कवडीमोल उत्पन्न प्राप्त होत असल्याने आता शेती नको रे बाबा असा ओरड सर्वत्र पाहायला मिळत आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही आणि जर उत्पादन चांगले मिळाले तर बाजारात पिकाला भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी बांधव दुहेरी कोंडीत अडकला आहे. याचा परिणाम म्हणून आता तरुण वर्गाला शेती ऐवजी नोकरीच आवडू लागली आहे.

मात्र असे असले तरी काही तरुणांनी अजूनही काळ्या आईशी इमान राखत शेती व्यवसाय करण्याला अधिक प्राधान्य दिले आहे. परंतु शेतकरी बांधवांच्या पुढ्यात असलेली संकटे अजून कमी झालेली नाहीत. अनेकदा नैसर्गिक आपत्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे तर काही वेळा मानवी चुका शेतकऱ्यांसाठी घातक ठरत आहेत.

काही शेतकऱ्यांचे दुसऱ्याच्या शेतातून पाणी येऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून दुसऱ्याच्या शेतातून आलेल्या पाण्यामुळे जर पिके आणि माती वाहून जात असेल तर काय केले पाहिजे ? असा सवाल उपस्थित केला जात होता.

दरम्यान आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, जर एखाद्या शेतकऱ्याचे शेती पिके आणि माती दुसऱ्याच्या शेतातून आलेल्या पाण्यामुळे वाहून जात असतील तर सदर शेतकरी दिवाणी न्यायालयात या विरोधात दावा ठोकू शकतो.

अर्थातच कायद्याने अशा शेतकऱ्यांविरोधात आवाज उठवला जाऊ शकतो. जाणकार लोक सांगतात की, यासाठी शेतकरी बांधवांनी दिवाणी न्यायालयात दावा केला पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये दिवाणी न्यायालय सदर शेतकऱ्याविरोधात आदेश जारी करून त्याला पाणी अडवण्याबाबत कायद्याने आदेशित करतात.