Agriculture News : गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मोसमी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पाहायला मिळत आहेत. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
यामुळे आता खरीप हंगामातील कामांना वेग येणार आहे. गेल्या दहा दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेती कामांना जवळपास ब्रेक लागला होता. पण आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या शेती कामांना वेग येणार आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय झाला असल्याने याचा नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांना फायदा होणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पावसा अभावी अजून पेरणी झालेली नसेल तिथे येत्या काही दिवसात आता पेरणी पूर्ण होणार आहे.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाजारात डीएपी खताचा शॉर्टेज होऊ शकतो. खरे तर, पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना खताची गरज भासत असते. यामध्ये डीएपी खताला दरवर्षी मागणी असते.
यामुळे अनेक ठिकाणी डीएपी खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. यामुळे शेतकऱ्यांनी डीएपी खत मिळाले नाही तर इतर पर्याय खतांचा वापर केला पाहिजे असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
डीएपी खतावरच अवलंबून न राहता इतर पर्यायी खतांचा वापर केला तर शेतकऱ्यांना विनाकारण अधिकचा खर्च करावा लागणार नाही. कारण की जेव्हा बाजारात खतांचा शॉर्टेज होतो तेव्हा काही नफेखोर लोकांच्या माध्यमातून खतांची काळाबाजारी केली जाते.
यामुळे डीएपी खतावर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी इतर पर्यायी खतांचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यामुळे आता आपण डीएपी खताला पर्यायी खत कोणते याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डीएपी ऐवजी कोणत्या खतांचा वापर करावा
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएपीची उपलब्धता झाली नाही तर डीएपी खताच्या एका गोणीऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी याप्रमाणे वापर केला पाहिजे.
एसएसपी बरोबरच एनपीके – १०:२६:२६, एनपीके – २०:२०:०:१३, एनपीके – १२:३२:१६ व एनपीके – १५:१५:१५ या संयुक्त खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्यसुद्धा पिकांना उपलब्ध होते, अशी माहिती जाणकारांनी दिली आहे.
याशिवाय कृषी तज्ञांनी डीएपी खताच्या एका गोणीऐवजी टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) एक गोणी + युरिया अर्धा गोणी याचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.