Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे. देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी शेतीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत आज आपण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. खरं पाहता, कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी खतांची गरज भासत असते.
पीक वाढीसाठी आवश्यक पोषक घटकांची पूर्तता करण्यासाठी खत आवश्यक असते. युरिया, डीएपी इत्यादी खत शेतकरी बांधव पीक वाढीसाठी वापरत असतात. मात्र अनेकदा शेतकऱ्यांची बनावटे खते देऊन दिशाभूल केली जाते. त्यांची फसवणूक होत असते. यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा फटका बसतो शिवाय उत्पादनात घट येते.
एवढेच नाही तर बनावट खते वापरल्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. यामुळे शेतकऱ्यांनी खते घेताना नेहमीच काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण खत ओरिजिनल आहे की बनावट हे कसे ओळखायचे याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
ओरिजिनल युरिया कसा ओळखणार
युरिया हे पीक वाढीसाठी आवश्यक सर्वाधिक महत्वाचे खत आहे. या खताचा वापर सर्वाधिक होत आहे. युरिया हे एक दाणेदार खत आहे. याचे दाणे हे पांढरे चमकदार आणि जवळजवळ समान आकाराचे असतात. युरिया खत पाण्यात पूर्णपणे विरघळते आणि विरघळलेल्या द्रावणाला स्पर्श केल्यावर थंडावा जाणवतो.
यामुळे युरिया खत ओरिजिनल आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपण युरियाचे दाणे पाण्यात टाका जर दाणे विरघळले आणि द्रावण थंड लागले तर खत ओरिजिनल आहे असे समजावे. तसेच युरिया तव्यावर गरम केल्यावर तो वितळतो, तव्यावर गरम केल्यास याचे कोणतेच अवशेष आढळत नाहीत. म्हणून युरिया ओरिजनल आहे की बनावट हे ओळखण्यासाठी युरियाचे दाणे तव्यावर गरम करा जर दाणे पूर्णपणे वितळले तर युरिया ओरिजनल आहे असे समजावे.
ओरिजिनल DAP कसं ओळखणार?
ओरिजिनल DAP ओळखण्यासाठी डीएपीमध्ये तंबाखूप्रमाणे चुना मिसळा आणि तंबाखू ज्या पद्धतीने चोळतात त्या पद्धतीने चोळा. आणि त्याचा वास घ्या. जर या चुना चोळलेल्या DAP चा वास तीव्र असेल अगदी आपल्याला सहन होणार नाही असा राहिला तर डीएपी ओरिजनल आहे असे समजावे.
पण याचा वास तीव्र नसेल तर हा DAP बनावट असू शकतो. तसेच फुल गॅस करून DAP गरम केल्यावर त्याचे दाणे फुगायला लागतात. यामुळे जर DAP चे दाणे गॅस वर गरम केल्यास फुगले नाहीत तर असा DAP डुप्लिकेट राहू शकतो. तसेच याचे दाणे काहीसे कडक, तपकिरी काळे आणि बदाम रंगाचे असतात. नखाने तोडण्याचा प्रयत्न केल्यास ते सहज तुटत नाहीत. म्हणून जें DAP नखाने सहज तुटतं असतील ते बनावट असू शकते. याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे.