Agriculture News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे तुरीच्या बाजारभावात पुन्हा एकदा सुधारणा पाहायला मिळाली आहे. एकीकडे राज्यात सोयाबीन आणि कापूस अगदी कवडीमोल दरात विकला जात आहे. तर दुसरीकडे तूर उत्पादक शेतकऱ्यांना मात्र यावर्षी चांगली कमाई होण्याची आशा आहे.
तुरीचे बाजार भाव आता पुन्हा एकदा सुधारले असून बाजारभावाची 11,000 कडे वाटचाल सुरू झाली आहे. तूर हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे.
या पिकाची मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात लागवड होते. दरम्यान आज राज्याच्या विदर्भ विभागातील वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला सर्वोच्च बाजार भाव मिळाल्याची नोंद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज राज्यातील वाशिम, सोलापूर, नागपूर आणि अमरावतीच्या बाजारांमध्ये तुरीचे कमाल बाजार भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक नमूद करण्यात आले आहेत.
यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.बाजारभावात सुधारणा झाली असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
पण, तुरीच्या उत्पादनात थोडीशी घसरण झाली असल्याने विक्रमी बाजार भावाचा देखील फारसा फायदा होणार नाही, अशी तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, आता आपण राज्यातील कोणत्या बाजारात तुरीची किती आवक झाली आणि तुरीला काय भाव मिळाला आहे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वोच्च भाव
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज 1500 क्विंटल तुरीची आवक झाली. आजच्या लिलावात या बाजारात तुरीला किमान 8750, कमाल 10335 आणि सरासरी 9750 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : येथे लाल तुरीची 404 झाली. लाल तुरीला या बाजारात कमाल दहा हजार तीनशे, किमान 9000 आणि सरासरी 9,800 रुपये एवढा भाव मिळाला आहे. पांढऱ्या तुरीला या बाजारात सरासरी दहा हजाराचा भाव मिळाला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात तुरीला कमाल 10200, किमान 9000 आणि सरासरी 9900 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात तुरीला कमाल दहा हजार दोनशे, किमान 9750 आणि सरासरी 9975 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.