आनंदाची बातमी ! ‘या’ बँकेने शेतकऱ्यांसाठी जाहीर केली बळीराजा मुदत कर्ज योजना, मिळणार 7 लाखांचे कर्ज, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : गेल्या कित्येक पिढ्यांपासून केला जाणारा शेतीचा व्यवसाय आता संकटात आला आहे. शेती क्षेत्रावर आणि शेतकऱ्यांवर नानाविध अशा संकटांचा भडीमार सुरु आहे. अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ, शेतीमालाला मिळत असलेला कवडीमोल दर, शेतकऱ्यांसाठी शासनाचे उदासीन धोरण या अशा नैसर्गिक आणि सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नसल्याचे दृश्य आहे.

यावर्षी तर महाराष्ट्रातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातून खूपच कमी उत्पादन मिळाले आहे. शिवाय उत्पादित झालेल्या शेतमालाला देखील चांगला दर मिळत नाही. सोयाबीन आणि कापसाला अगदी कवडीमोल भाव मिळतोय.

कांद्याच्या बाबतीत देखील तशीच परिस्थिती आहे. परिणामी शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. विशेष म्हणजे कमी पावसाचा फटका रब्बी हंगामाला देखील बसणार आहे. रब्बी हंगामातूनही अपेक्षित असे उत्पादन मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

यामुळे शेतकरी संकटात सापडला असून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी पुणे जिल्हा बँकेने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी बळीराजा मुदत कर्ज योजना नावाची एक नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेतून बँकेच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांना 1.5 लाखांपासून ते सात लाखांपर्यंतचे मुदती कर्ज दिले जाणार आहे.

शेती अनुषंगिक खर्च, देखभालीचा खर्च, औषधोपचार, व्यावसायिक गरजा, शैक्षणिक खर्च, घर दुरुस्ती, वाहन खरेदी, विवाह, औषधोपचार, जनावरांच्या देखभालीचा खर्च, अशा विविध बाबींसाठी या योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा केला जाणार आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी ही माहिती लोकमत या प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला दिली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा बँकेतील सभासद शेतकऱ्यांना सहजतेने आकस्मिक आणि तत्पर कर्ज उपलब्ध होणार आहे.

मात्र यंदाही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जाणार आहे. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जावर साडेदहा टक्के एवढे व्याजदर आकारले जाणार आहे.

या कर्जाचा परतफेडीचा कालावधी सात वर्षांपर्यंतचा राहणार आहे. योजनेअंतर्गत एकरी कमीत कमी एक लाख 50 हजार पासून ते सात लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे.

म्हणजेच जिल्हा बँकेतील सभासद शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार या योजनेअंतर्गत कर्जाचा पुरवठा केला जाणार असून ही मुदती कर्जाची योजना निश्चितच जिल्हा बँकेतील सभासद शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा