शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार मोठी भेट ! ‘या’ पिकांच्या एमएसपीमध्ये होणार मोठी वाढ, हमीभाव 10% वाढणार, पहा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : सध्या महाराष्ट्राचा संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम जोरात सुरू आहे. सणासुदीच्या हंगामामुळे संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा सण साजरा झाला आहे. गेल्या महिन्यात साजरा झालेला गणेशोत्सवाचा सण संपूर्ण भारत वर्षात आनंदाचे वातावरण तयार करून गेला आहे.

विशेष म्हणजे या चालू ऑक्टोबर महिन्यात देखील विविध सण संपूर्ण देशात सेलिब्रेट केले जाणार आहेत. ऑक्टोबर मध्ये नवरात्र उत्सव, विजयादशमी, दुर्गाष्टमी तसेच नोव्हेंबर मध्ये दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा या सणासुदीच्या हंगामात देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी गुड न्यूज समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच एक मोठी भेट देणार आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की पुढल्या वर्षी अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून सर्वसामान्यांना खुष करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. काल केंद्र शासनाने उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडरच्या सबसिडी मध्ये शंभर रुपयांची वाढ केली आहे.

म्हणजेच आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरवर तीनशे रुपयांची सबसिडी मिळणार आहे. याआधी या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर 200 रुपये स्वस्त देण्याचा निर्णय झाला होता. याचाच अर्थ आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर फक्त सहाशे रुपयात मिळणार आहे.

जाणकार लोकांनी केंद्र शासनाने आगामी लोकसभा निवडणुका पाहता महिला मतदारांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. अशातच आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. केंद्रातील मोदी सरकार लवकरच गव्हासह प्रमुख रब्बी पिकांच्या हमीभावात मोठी वाढ करणार आहे.

गव्हाच्या एमएसपीमध्ये म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस सरकार दहा टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय दिवाळीपूर्वीच घेतला जाणार आहे. यामुळे दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

गव्हाच्या एम एस पी किती वाढू शकतो?

केंद्रातील मोदी सरकार रब्बी पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. गव्हाच्या एमएसपीत दहा टक्के वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच जवळपास 150 ते 175 रुपये प्रति क्विंटल एवढी वाढ केली जाणार आहे. या निर्णयामुळे गहू उत्पादक राज्यांमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सध्या गव्हाला 2125 रुपये प्रति करून एवढा हमीभाव मिळत आहे. आता यामध्ये दहा टक्के वाढ होण्याची शक्यता असून असा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यास गव्हाला 2300 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव मिळण्याची शक्यता आहे.

केव्हा घेतला जाणार निर्णय?

रब्बी पिकांच्या एमएसपीत वाढ करण्याचा निर्णय येत्या आठवड्यात घेतला जाण्याची दाट शक्यता एका मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवण्यात आली आहे. यामध्ये गव्हाच्या आणि मसूरच्या एमएसपीत दहा टक्के, मोहरी आणि सूर्यफुलाच्या एमएसपीत पाच ते सात टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा निर्णय 2024-25 या वर्षासाठी घेतला जाणार आहे.

एमएसपी मध्ये कोणत्या पिकांचा समावेश होतो?

एमएसपीमध्ये रब्बी हंगामातील 23 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामधे गहू, भात, बाजरी, मका, ज्वारी, नाचणी आणि जो या तृणधान्ये पिकांचा समावेश होतो. तसेच कडधान्ये पिकात हरभरा, मूग, मसूर, वाटाणा, उडीद या पिकांचा समावेश होतो.

तेलबिया पिकांमध्ये मोहरी, सोयाबीन, तीळ, करडई, भुईमूग, सूर्यफूल, नायजर बियाणे या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच ऊस, कापूस, कोपरा आणि कच्चा ताग या कॅश क्रॉप पिकांचा देखील एमएसपीच्या यादीमध्ये समावेश आहे.