मोठी बातमी ! शिंदे सरकारने राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांसाठी जाहीर केली 154 कोटींची मदत, कोणाला मिळणार फायदा? वाचा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : या चालू वर्षात पावसाचा लहरीपणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच घातक ठरला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपीक यंदाच्या हंगामात भुईसपाट झाले असून यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामुळे अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदतीची मागणी केली जात होती. याबाबतचे प्रस्ताव देखील विभागीय आयुक्तांनी सरकारकडे सादर झाले होते.

दरम्यान या प्रस्तावावर सकारात्मक असा निर्णय घेत राज्यातील शिंदे सरकारने अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 154 कोटी रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.गुरुवारी याबाबतचा निर्णय झाला असून आता लवकरच यासंबंधित शेतकऱ्यांना मदतीचा पैसा मिळणार आहे.

कोणाला मिळणार लाभ

राज्यात जानेवारी ते जून 2023 या कालावधीमध्ये विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुणे आणि नागपूर या भागातील शेतकऱ्यांचे पिके भुईसपाट झाली होती आणि याच शेती पिकांसाठी विभागीय आयुक्तांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.

दरम्यान या प्रस्तावानुसार आता या संबंधित भागातील शेतकऱ्यांना 9 कोटी 80 लाख 72 हजार रुपये मदत निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. याशिवाय जून ते ऑक्टोबर या कालावधीत नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि कोकण विभागातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते.

दरम्यान यासाठी विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार 136 कोटी 61 लाख 6 हजार रुपये मदत निधी वितरित करण्यास शिंदे सरकारने गुरुवारी मंजुरी दिली आहे.

याशिवाय नागपूर शहरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत म्हणून आठ कोटी 38 लाख 54 हजार रुपये एवढा मदत निधी वितरित करण्यात आला आहे.

या मदत निधी मधून ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिकचे नुकसान झाले असेल त्यांना मदत दिली जाणार आहे.

निश्चितच शिंदे सरकारने राज्यातील अवकाळी पावसाने आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत निधी वितरित करण्यास परवानगी दिली असल्याने या संबंधित भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच शासनाच्या या निर्णयाचे संबंधित शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा