शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! नवीन वर्षात सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, मग शेतकऱ्यांना दरवर्षी मिळणार….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे भारताची जवळपास 50 टक्के लोकसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेतीशी संबंधित आहे. हेच कारण आहे की, या कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांच्या आणि शेती क्षेत्राच्या उत्थानासाठी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपयोजना केल्या जात आहेत.

सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने देखील शेतकऱ्यांच्या हितार्थ विविध निर्णय घेतले आहेत. पीएम किसान सन्माननिधी योजनेसारख्या काही महत्त्वाकांक्षी योजना सुरु केल्या आहेत.

दरम्यान याच पीएम किसान योजने संदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. खरंतर एक फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

निर्मला सीतारामन आपला सहावा अर्थसंकल्प यावेळी संसदेत मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेत मोठी वाढ करण्याची घोषणा अर्थमंत्री सीतारामन करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जात आहेत. मात्र आता यामध्ये आणखी दोन हजाराची भर घातली जाणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आठ हजार रुपयांचा निधी दिला जाऊ शकतो आणि याची घोषणा ही फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. 

काय आहे पीएम किसान योजना ? 

पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र लाभार्थ्यांना सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक समान तीन हफ्त्यात पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जात आहेत.

त्यामुळे ही योजना अल्पावधीतच शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 हप्ते मिळाले आहेत.

मागील 15 वा हफ्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला आहे. अशातच आता या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ होणार असा दावा केला जात आहे.

सध्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 6,000 मिळत आहेत मात्र यामध्ये आणखी दोन हजार वाढवून आठ हजार रुपये केले जातील असा दावा एका प्रतिष्ठित वृत्त संस्थेने केला आहे. यामुळे खरंच मोदी सरकार या योजनेचा पैसा वाढवतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा