Agriculture News : शेती व्यवसायात शेतकरी बांधवांना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने मजूरटंचाईचा सामना अलीकडे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी सिद्ध होत आहे. शेती कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे वेळेवर होत नाहीत परिणामी याचा उत्पादनावर आणि उत्पन्नावर परिणाम होत आहे.
यामुळे आता शेतकरी बांधव अगदी पीक पेरणी पासून ते पीक काढणीपर्यंत यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे चित्र आहे. यामध्ये हार्वेस्टिंग साठी आता यंत्रांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र शेतकऱ्यांना जर समजा सोयाबीनची काढणी करायची असली तर सोयाबीन साठी स्पेशल असं काढणी यंत्र लागत.
म्हणजे एका यंत्राचा वापर करून केवळ एकाच पिकाची काढणी ही शेतकऱ्यांना करावी लागते. मात्र आता असं एक हार्वेस्टिंग यंत्र आलं आहे ज्याच्या माध्यमातून तब्बल तीन पिकांची काढणी करता येणे शक्य होणार आहे. सोयाबीन हरभरा आणि तांदूळ म्हणजेच भात पिकाची काढणी करण्यासाठी एक यंत्र नव्याने विकसित झाल आहे.
हे यंत्र पुणे येथील मोशी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या किसान कृषी प्रदर्शन या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कृषी प्रदर्शन 14 ते 18 डिसेंबर 2022 दरम्यान आयोजित झाले होते. या ठिकाणी वेगवेगळ्या कृषी यंत्रांचे प्रदर्शन झाले. यामध्ये या यंत्राने शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधले होते.
खरं पाहता आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन हरभरा तसेच भात पिकाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना देखील या यंत्राचा बेनिफिट होणार आहे. या यंत्रामुळे सोयाबीन हरभरा भात अशा पिकांची वेळेत काढणी होणार आहे. अनेकदा सोयाबीन काढणी दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसतो.
यामुळे शेतकरी बांधव सोयाबीन पीक काढणीच्या अवस्थेत आलं की लवकरात लवकर याची काढणी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एकाच वेळी बहुसंख्य शेतकऱ्यांचा सोयाबीन काढण्यासाठी येत असल्याने त्यामुळे मजूर टंचाई जाणवते. अशा परिस्थितीत या यंत्राचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. हे यंत्र आरजे ऍग्री टेक्निकल या कंपनीने विकसित केले आहे.
विशेष म्हणजे या यंत्राने सोयाबीन, हरभरा भात या तिन्ही पिकाची काढणी होत असल्याने त्या शेतकऱ्यांमध्ये या यंत्राविषयी जाणून घेण्याबाबत अधिक उत्सुकता पाहायला मिळत आहे. 3000 हॉर्स पॉवरची या यंत्राची क्षमता असून या मशीनची कटर सात फूट लांबीचे आहे. तसेच दोन पात्यांमधील अंतर देखील कमी आहे यामुळे काढणी व्यवस्थित रित्या होण्यास मदत होणार आहे.
यासोबतच 9000 हॉर्स पॉवरची क्षमता असलेले काढणी यंत्र देखील या कंपनीने बाजारात आणले आहे. या मशीनमध्ये एसी कॅबिन असून केबिनची डिझाईन देखील अतिशय उत्कृष्ट असल्याचा दावा कंपनीचा आहे. निश्चितच या यंत्रामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी हे यंत्र प्रभावी साधन ठरणार आहे.