रब्बी हंगामापूर्वी पंजाबरावांचा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला ! पेरणी करण्यापूर्वी एकदा वाचाच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारतीय हवामान विभागाने काल भारतातून मान्सून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक अक्षरशः घामाघुम होत आहेत.

नागरिकांना ऑक्टोबर हिटचा तडाखा सहन करावा लागत आहे. सध्या राज्यातील शेतकरी बांधव सोयाबीन, मका आणि कापूस पिकाची हार्वेस्टिंग करत आहेत. येत्या काही दिवसात आता रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामातील पीक पेरणीसाठी शेतकरी बांधव जमिनीची मशागत देखील करत आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच मात्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि कामाचा सल्ला दिला आहे. पंजाबरावांचा हा सल्ला रब्बी हंगामात जे शेतकरी बांधव गहू आणि हरभरा पेरू इच्छित असतील त्यांच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. खरंतर रब्बी हंगामामध्ये आपल्या राज्यात गव्हाची आणि हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते.

यंदाही ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे तसेच ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे तेथे हरभरा आणि गव्हाची पेरणी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पंजाबरावांनी शेतकरी बांधवांना गहू आणि हरभरा पेरताना काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

पंजाबरावांनी गहू आणि हरभऱ्याची पेरणी थंडीची तीव्रता वाढली की मगच करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात की गहू आणि हरभरा पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी एक प्रयोग करून पाहायला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी एका स्टीलच्या वाटीत खोबरेल तेल घ्यायचे आहे आणि एका ठिकाणी ठेवायचे आहे. ज्यावेळी हे तेल सकाळी घट्ट होईल तेव्हा गहू आणि हरभरा पेरणी केली पाहिजे.

हरभरा पेरणी करतांना ही काळजी घ्या

हरभरा पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी रोटावेटर मारायचे आहे. यानंतर हरभऱ्याच्या सुधारित जाती निवडायच्या आहेत. मग सुधारित जातींची 18 इंचावर किंवा 24 इंचावर पेरणी करायची आहे. हरभऱ्याची पेरणी खोल करायची आहे. पेरणी करताना एकरी 35 ते 40 किलो बियाणे वापरायचे आहे.

तसेच हरभरा पिकात पाणी व्यवस्थापन करताना जर समजा जमिनीत ओल नसेल तर पेरणी ज्या दिवशी कराल त्या दिवशी स्प्रिंकलरच्या साह्याने दोन तास पाणी द्यायचे आहे. यानंतर पेरणीनंतर वीस दिवसांनी दुसऱ्या पाणी द्यायचे आहे.

दुसरे पाणी पाच तासांसाठी द्यायचे आहे. यानंतर तिसरे पाणी चाळीस दिवसांनी द्यायचे आहे. तिसरे पाणी देताना सात घंटे स्प्रिंकलर चालू ठेवायचा आहे. तसेच पिक फुलोरा अवस्थेत आल्यास पाण्याचा ताण द्यायचा आहे. याशिवाय खत नियोजन करताना शेतकरी बांधवांनी एक खताची बॅग आणि दहा किलो गंधक वापरायचे आहे.