Agriculture News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ‘या’ तारखेपूर्वी मदत जाहीर करण्याचे आदेश जारी, खरी माहिती जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : यावर्षी राज्यात अतिवृष्टीने चांगलाचं थैमान माजवला होता. जून ते ऑगस्ट या कालावधीत राज्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला. यामुळे खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.

अशा परिस्थितीत मायबाप शासनाने (Maharashtra Government) शेतकऱ्यांना (Farmer) नुकसान भरपाई (Compensation) देण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 3501 कोटी रुपयांची मदत (Crop Insurance) जाहीर करण्यात आली आहे.

सहाजिकच त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थोडा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यामुळे निश्चितच नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांचे संपूर्ण नुकसान भरून निघणार नाही मात्र यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शासनाने जारी केलेला हा निधी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही. यामुळे नुकसान भरपाई बाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत प्रत्यक्ष जारी केली जाणार आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 14 ऑक्टोबर पूर्वीच नुकसानभरपाईची मदत दिली जाणार आहे. म्हणजेच या पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिवाळीआधीच राज्य शासनाकडून एक मोठे गिफ्ट मिळणार आहे. या संबंधित पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शंभर टक्के नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश आता जारी झाले आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या पाच जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची शंभर टक्के रक्कम 14 ऑक्टोबर पूर्वी दिली जाणार आहे हे आज आपण जाणुन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की अमरावती विभागासाठी नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई हे दोन टप्प्यांमध्ये मिळणार होती. यासाठी 1457 कोटी रुपयांचा निधी अमरावती विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. मात्र आता निधी मंजूर होऊन एक महिना उलटला आहे तरीदेखील प्रत्यक्ष मात्र शेतकरी बांधवांना एक छदाम देखील मिळालेला नाही.

अशा परिस्थितीत अमरावती विभागातील शेतकर्‍यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळत होता. नुकसान भरपाईची निधी लवकरात लवकर मिळावी या अनुषंगाने नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांकडून आंदोलने केली जात होती. मात्र आता अमरावती विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मित्रांनो अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना 14 ऑक्टोबर पूर्वी नुकसानभरपाईची मदत प्रत्येक्ष जारी होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

मित्रांनो खरे पाहता विदर्भ पटवारी संघाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना निधी जारी करण्यासाठी असमर्थता व्यक्त करण्यात आली होती. यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळण्यास विलंब होत होता. मात्र आता शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन 3 ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून परिपत्रक काढून अमरावती विभागातील पाच जिल्हाधिकाऱ्यांना संबंधित जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तात्काळ निधीचे वितरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना 14 ऑक्टोबर पूर्वी नुकसान भरपाईची रक्कम जारी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांकडून जारी करण्यात आले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्रामविकास विभाग यांना नुकसानग्रस्त गावांचा डाटा गोळा करून याची माहिती शासनाला तात्काळ पाठविण्याचे निर्देश जारी झाले आहेत. एकंदरीत आता अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment