Agriculture News : अलीकडे प्रत्येकच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. कृषी क्षेत्र देखील यापासून अछूत नाही. कृषी क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वावर वाढलेला आहे. वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे आता शेती व्यवसाय सोपा झाला आहे. आधीच्या तुलनेत आता शेतकऱ्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागत नाही.
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेती कामासाठी वेगवेगळी आधुनिक यंत्र तयार झाली आहेत, ज्यामुळे शेती कसणे सोपे झाले आहे. विशेष म्हणजे आता शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या आणि यांत्रिकीकरणाचे पुढचं पाऊल टाकल आहे. शास्त्रज्ञांनी शेतीसाठी नवीन टेक्नॉलॉजी विकसित केली आहे.
ही टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करून तयार करण्यात आली आहे. खरंतर शेती क्षेत्रात वेगवेगळ्या उपकरणांसाठी यंत्रांसाठी आधीच इलेक्ट्रॉनिकचा वापर होत आहे. पण आता प्रत्यक्षात शेतीमधील घटकच इलेक्ट्रॉनिकचे राहणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कृषी शास्त्रज्ञांनी चक्क इलेक्ट्रॉनिक माती तयार केली आहे. याचा वापर शेतीसाठी होणार आहे. विद्युत वाहक इलेक्ट्रॉनिक माती किंवा ई-सॉईल विकसित करण्यात आली आहे. या इलेक्ट्रॉनिक सॉईलच्या मदतीने पंधरा दिवसात जवसाचे पीक जेवढे सामान्य मातीत वाढले असते त्यापेक्षा 50 टक्के अधिक वाढू शकते.
खरे तर कृषी शास्त्रज्ञांनी हायड्रोपोनिक लागवड म्हणजेच मातीविना शेती तंत्रज्ञानासाठी विद्युत प्रवाहकीय लागवड सबस्ट्रेट विकसित केला असून याला शास्त्रज्ञांनी इ-सॉईल म्हणजे इलेक्ट्रॉनिक माती असे नाव दिले आहे.
या इलेक्ट्रॉनिक सॉईलमध्ये वीज प्रवाहित करून जवससारखे पीक अंकुरित केले जाणार आहेत. हे भन्नाट आणि शेतकऱ्यांसाठी खास असे संशोधन लिकोपिंग विद्यापीठात यशस्वी झाले आहे.
खरे तर हायड्रोपोनिक्स फार्मिंग अर्थातच माती विना शेती ही शेतीची एक आधुनिक पद्धत आहे ज्यामध्ये पीक वाढीसाठी मातीची गरज लागत नाही. अशा प्रकारच्या शेतीमध्ये पाण्यातच पीक वाढीसाठी आवश्यक असलेले पोषक घटक दिले जातात.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने लेट्यूस, औषधी वनस्पती, स्ट्रॉबेरी, पालेभाज्या यांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. दरम्यान याच आधुनिक तंत्रज्ञानात अजून सुधारणा व्हावी यासाठी या नवीन इलेक्ट्रॉनिक सॉईलचा शोध कृषी तज्ञांनी लावला आहे.
यामुळे जगभरातील अन्नाची गरज पूर्ण होऊ शकणार आहे. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता मानवाला अधिक अन्नाची गरज भासणार आहे. पण पारंपारिक पद्धतीने शेती केली तर कदाचित ही गरज पूर्ण होऊ शकणार नाही.
हेच कारण आहे की आता अशा आधुनिक तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. यामुळे हे नव्याने विकसित झालेले तंत्रज्ञान, अर्थातच इलेक्ट्रॉनिक सॉईल खूपच उपयुक्त ठरणार आहे.