आता शेतातील मोटारीसाठी ऑटो बसवला तर शेतकऱ्यांवर कठोर कारवाई होणार; पण ‘हे’ 500 रुपयाचे यंत्र बसवण्यास परवानगी मिळणार, विज बिलातही बचत होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. पिकाच्या वाढीसाठी पाणी हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता मातीविना शेती होऊ लागली आहे मात्र पाण्याविना शेती होऊच शकत नाही. दरम्यान शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कृषी पंपाची आवश्यकता भासत असते. मात्र कृषी पंपासाठी लागणाऱ्या विजेच्या पुरवठ्यासाठी मोटारीला ऑटो स्विच बसवला जातो.

अनेक शेतकरी बांधव मोटारीसाठी ऑटो बसवतात. ऑटो बसवल्याने शेतकऱ्यांची वारंवार मोटर चालू करण्याची झंझट कमी होते. मात्र यामुळे काही तोटे देखील होत आहेत. ऑटो बसवल्याने शेतकऱ्यांचा मोठा वेळ वाचतो. पण ऑटोमुळे एकाच वेळी शिवारातील सर्व कृषी पंप चालू होतात.

म्हणजेच लाईट गेली असता बंद झालेले कृषी पंप ऑटोमुळे लाईट आल्यानंतर एकाच वेळी चालू होतात. याचा परिणाम म्हणून डीपी वरील लोड अचानक वाढतो आणि यामुळे डीपी जळण्यासारख्या घटना घडतात. 11 केव्ही किंवा लो टेंशन लाईन्सच्या तारा तुटतात.

परिणामी या अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने एक मोठा निर्णय घेतला आहे. महावितरणाने मोटारीसाठी आता ऑटो स्विच बसवण्यास मनाई केली आहे. कृषी पंपांना आता ऑटो स्विच ऐवजी कपॅसिटर बसवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

तसेच शेतकऱ्यांनी कपॅसिटर बसवून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. कृषी पंपांना क्षमतेनुसार कॅपॅसिटर बसवल्यास डीपी जळणे, तार तुटणे यांसारख्या घटना कमी होतील, असे बोलले जात आहे.

यामुळे सर्व विभागीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना कॅपॅसिटर बसवण्यासाठी जागृत करावे असे सांगितले गेले आहे. कपासिटर बसवण्याबाबत जनजागृती करण्यासंदर्भात महावितरणकडून संबंधितांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

एवढेच नाही तर ऑटो स्विचचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी आता एक विशेष टीम सुद्धा नेमण्यात आली आहे. खर तर डीपी जळाली तर शेतकऱ्यांचे नुकसान होते.

डीपी जळाल्यास ताबडतोब डीपी येत नाही यामुळे पिकांना पाणी देण्यात अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत, डीपी जाण्याच्या घटना कमी व्हाव्यात यासाठी ऑटो ऐवजी कपॅसिटर बसवणे शेतकऱ्यांसाठीच फायदेशीर आहे.

विशेष म्हणजे कपॅसिटर शेतकऱ्यांच्या खिशाला देखील परवडणारे आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे विज बिलात देखील बचत होते. कॅपॅसिटर मुळे विज बिलात जवळपास 30 टक्क्यांपर्यंतची बचत होऊ शकते असा दावा करण्यात आला आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा