शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ! गव्हाच्या किमती कमी करण्यासाठी मोदी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : आपल्या देशात गहू या प्रमुख अन्नधान्य पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गव्हाची लागवड रब्बी हंगामामध्ये होते. या नवीन हंगामातील गहू लागवड येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. तत्पूर्वी मात्र गहू उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तेजीत आलेले गव्हाचे बाजारभाव कमी करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने काही महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घेण्याचे ठरवले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

खरतर सध्या संपूर्ण देशात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. सध्या नवरात्र उत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात गणेशोत्सवाचा सण साजरा झाला आहे. पुढील महिन्यात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. यामुळे सध्या बाजारात गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. साहजिकच मागणी वाढली असल्याने बाजारभावात देखील तेजी आली आहे. सणांआधी गव्हाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत असल्याने सर्वसामान्यांचे किचन मधील बजेट बिघडले आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

बाजारातील मोठी मागणी पाहता देशांतर्गत बाजारात गव्हाच्या किमतीने आठ महिन्यांचा उच्चांकी टप्पा गाठला आहे. यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांना आता कुठे थोडासा दिलासा मिळत होता. गव्हातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळेल असे वाटत होते. अशातच मात्र केंद्र शासन गहू उत्पादक शेतकऱ्यांना जोर का झटका देण्याच्या तयारीत असल्याचे सूचक वृत्त समोर येत आहे.

असे मानले जात आहे की मोदी सरकार सर्वसामान्य लोकांना दिलासा देण्यासाठी, किरकोळ बाजारातील गव्हाच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी लवकरच काही महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. सरकार आता खुल्या बाजारात आपल्या इनव्हेंटरी मधून अधिक गहू सोडू शकते. तसेच केंद्र सरकार गव्हाच्या आयातीवरील शुल्क देखील काढून टाकण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे किरकोळ बाजारात गव्हाच्या किमती कमी होतील असे वाटतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर आपण सरकारी आकडेवारी पाहिली तर, 17 ऑक्टोबर 2023 ला गव्हाला सरासरी 30.29 रुपये प्रति किलोपर्यंतचा भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे कमाल किंमत 58 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. खरतर में महिन्यात गव्हाला सरासरी 28.74 रुपये प्रति किलो आणि कमाल 49 रुपये प्रति किलो पर्यंतचा भाव मिळत होता.

मात्र मे महिन्यानंतर गव्हाच्या बाजारभावातील वाढ सुरूच आहे. शिवाय, बाजारात गव्हाचे नवीन पीक मार्च 2024 नंतर बाजारात येणार आहे. शिवाय कमी पावसामुळे गव्हाच्या उत्पादनावर देखील यंदा विपरीत परिणाम होणार आहे. यामुळे भविष्यात गव्हाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

हेच कारण आहे की सरकार किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या कोट्यातून गहू खुल्या बाजारात सोडणार आहे. याशिवाय गव्हासाठीचे आयात शुल्क देखील काढले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या गव्हासाठी 40% आयात शुल्क लागू आहे मात्र लवकरच हे शुल्क काढले जाऊ शकते असे सांगितले जात आहे.