Agriculture News : शेतीतून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी शाश्वत पाण्याची उपलब्धता आवश्यक असते. मात्र काही शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता नसते. यामुळे दुसऱ्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या स्रोतातून पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आणले जाते.
जवळील नदी-नाल्यांमधून, विहिरीतून पाईपलाईन द्वारेपाणी आणले जाते. विशेषतः उन्हाळ्यात पाईपलाईन करणाऱ्यांची संख्या वाढते. उन्हाळ्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे रान मोकळे असते. यामुळे या कालावधीत पाईपलाईन केली तर कोणाचे नुकसान होत नाही.
हेच कारण आहे की उन्हाळ्यात पाईपलाईन करण्याला विशेष पसंती दाखवले जाते. मात्र अनेकांच्या माध्यमातून पाईपलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांकडून आडकाठी लावली जात असल्याची तक्रार केली जात आहे.
पाईपलाईन ज्या मार्गाने बनवली जाते तेथील काही शेतकरी पाईपलाईनवर आक्षेप घेतात. विशेष म्हणजे या कारणांवरून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद-विवाद देखील होत आहेत.
हेच कारण आहे की अनेकांच्या माध्यमातून जर एखादा शेतकरी त्याच्या जमिनीतून पाईपलाईन खोदु देत नसेल तर काय केले पाहिजे ? यासाठी कोणाकडे तक्रार केली पाहिजे यासारखे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे सविस्तर उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पाईपलाईनसाठी विरोध होत असेल तर काय करावे?
जर तुम्ही दुसऱ्याच्या शेतातून पाईपलाईन खोदत असाल आणि त्याने तुमच्या पाईपलाईनला विरोध केला असेल तर तुम्ही अशावेळी कायद्याचा आधार घेऊ शकता. ज्याने पाईपलाईनसाठी विरोध केला आहे त्याच्याविरोधात तुम्हाला तक्रार करता येणार आहे.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 या कायद्यांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन, पाट, जलमार्ग बांधण्यासंबंधीचे अधिकार प्राप्त झालेले आहेत. जर एखादा शेतकरी पाईपलाईनसाठी विरोध दाखवत असेल तर तुम्ही थेट तहसीलदाराकडे यासाठी अर्ज करू शकता.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 49 नुसार तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे. तहसीलदाराकडे अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता मात्र करावी लागणार आहे. तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज भरायचा आहे.
यानंतर जमिनीचा नकाशा, सातबारा उतारा, पाईपलाईनचा संपूर्ण आराखडा तुम्हाला अर्ज भरताना सादर करावा लागणार आहे. या अर्जात जो शेतकरी पाईपलाईनसाठी अडवणूक करत आहे त्याचे नाव आणि त्याचा गट नंबर देखील टाकावा लागणार आहे.
एकदा की तहसील कार्यालयात तुमचा अर्ज आला की यानंतर तहसीलदाराच्या माध्यमातून सदर शेतकऱ्याला समजूत दिली जाते. मग तुमचा पाईपलाईन करण्याचा मार्ग मोकळा होतो. मात्र पाईपलाईन करताना दुसऱ्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी पाईपलाईन करणाऱ्याने घेणे अपेक्षित आहे.