Agriculture News : भारतात ज्वारीची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याची लागवड दुहेरी उद्देशाने होते. ज्वारीची लागवड ही धान्य उत्पादनासाठी तर केली जातेच शिवाय याची लागवड ही चारा उत्पादनासाठी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. खरंतर भारतात शेतीसोबतच पशुपालनाचा व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात होतो.
पशुपालनाचा व्यवसाय हा शेती व्यवसायाला पूरक आहे. यामुळे आपल्याकडे शेती सोबतच पशुपालन मोठ्या प्रमाणात होते. पशुपालनाचा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडतो मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न नेहमीच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतो.
जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते. दरम्यान पशुपालन व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी एक मोठी भेट दिली आहे.
ICAR च्या कृषी शास्त्रज्ञांनी देशभरातील शेतकऱ्यांसाठी ज्वारीची एक नवीन जात विकसित केली आहे. कृषी शास्त्रज्ञांनी पशुखाद्यासाठी ज्वारीची नवीन जात विकसित केली आहे. दरम्यान आता आपण या जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ज्वारीच्या नव्या जातीच्या विशेषता खालील प्रमाणे
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या ज्वारीच्या या नवीन जातीचे नाव CSV 59BMR असे ठेवण्यात आहे. ही जात ICAR च्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. ही जात हिरव्या चाऱ्यासाठी फारच उत्तम असून यापासून शेतकऱ्यांना चाऱ्याचे विक्रमी उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.
हा तपकिरी स्टेम चाऱ्याचा एक प्रकार आहे जो जनावरांसाठी फारच चांगला आहे. या चाऱ्यात लिग्निनचे प्रमाण कमी असते आणि हा चारा जनावरांच्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो. जनावरांना हा चारा सहजच पचतो. हा चारा अल्पावधीतच खात्यात पचतो त्यामुळे जनावरांचा संपूर्ण आहार मजबूत राहतो.
या चाऱ्यामध्ये लिग्निनचे प्रमाण कमी आढळून आल्याने जनावरे सहज पचवतात. ज्वारीच्या या जातीचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीपासून शेतकऱ्यांना अधिक चाऱ्याचे उत्पादन मिळते. ही ज्वारी शेतकऱ्यांना 380 ते 400 क्विंटल प्रति हेक्टरी हिरवा चारा देते, तर कोरड्या चाऱ्याचे उत्पादन हेक्टरी 116 ते 120 क्विंटल मिळते.
या चाऱ्यात प्रथिनांचे प्रमाण 8.7 टक्क्यांपर्यंत आहे. ज्वारीची CSV 59BMR ही नवीन जात तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये पेरणीसाठी शिफारशीत करण्यात आली आहे.
ICAR ने या राज्यांमध्ये ज्वारीच्या या जातीची लागवड करण्याची शिफारस केली आहे. शेतकरी हे ज्वारीचे बियाणे नॅशनल सीड कॉर्पोरेशनच्या ई-कॉमर्स वेबसाइटवर म्हणजेच NSC वर ऑनलाइन ऑर्डर करून घरबसल्या मागवू शकतात. तसेच शेतकऱ्यांना हे बियाणे स्वस्तात मिळणार आहे.
ज्वारीच्या या नव्या जातीमुळे शेतकऱ्यांना चाऱ्याचे विक्रमी उत्पादन मिळवता येईल आणि यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार अशी आशा या निमित्ताने आता व्यक्त होऊ लागली आहे.