Agriculture News : खरीप आणि रब्बी हंगाम सुरू झाला की बाजारात अचानक खतांचा शॉर्टेज निर्माण होतो. पीक वाढीसाठी आवश्यक असलेले खत ऐन खरीप आणि रब्बी हंगामातच शेतकऱ्यांना मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतकरी बांधव खत खरेदीसाठी दुकानावर गेले की दुकान मालक खताचा साठा उपलब्ध नाही असे म्हणतात. काही प्रसंगी दुकानावर खरच खत उपलब्ध नसते.
मात्र काही दुकानदार खताचा साठा उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खत उपलब्ध नाही म्हणून सांगतात. म्हणजेच कृत्रिम खत टंचाई तयार करण्याचा प्रयत्न दुकानदार करतात. म्हणजे खताचा काळाबाजार केला जातो. दरवर्षी खताच्या काळाबाजारच्या बातम्या समोर येतात. त्यामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांना अधिकच्या किमतीत खतांची खरेदी करावी लागते.
अशा परिस्थितीत आज आम्ही शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आम्ही तुम्ही ज्या भागात राहतात त्या भागातील खत दुकानात खताचा साठा उपलब्ध आहे की नाही हे ऑनलाइन कसं शोधायचं याविषयी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलवर अवघ्या दोन मिनिटातच तुमच्या जवळील खत दुकानात खताचा साठा उपलब्ध आहे की नाही हे चेक करू शकणार आहात. यामुळे तुमच्या जवळील खताच्या दुकानात खताचा साठा आहे की नाही याची तुम्हाला आधीच माहिती मिळेल आणि खताचा साठा उपलब्ध असेल तेव्हाच तुम्ही दुकानात जाल. जर दुकानात खत नसेल तर तुम्ही दुकानात जाणे टाळाल किंवा दुसऱ्या दुकानात जाल यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो.
दुकानात खताचा साठा आहे की नाही हे कसं बघणार?
तुमच्या जवळील खत दुकानात खत आहे की नाही हे शोधण्यासाठी तुम्हाला https://fert.nic.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला फर्टीलायझर डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्या स्क्रीनवर ई उर्वरक नावाचे एक पेज ओपन होईल. मग या पेजवरील उजवीकडे असलेल्या किसान कॉर्नर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
येथे Retailer Opening Stock As On Today अस लिहलेले दिसेल त्याखाली तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा आणि रिटेलर आयडी निवडावा लागेल. जर तुम्हाला दुकानदाराचा रिटेलर आयडी माहिती नसेल तर तुम्ही एजन्सी नेम या पर्यायासमोर दुकानाचे नाव निवडू शकता. यानंतर तुम्हाला त्या दुकानात खताचा साठा उपलब्ध आहे की नाही याबाबत सविस्तर अशी माहिती पाहायला मिळणार आहे.