शेती करायची पण जमीन नाही ? चिंता करू नका, सरकार देणार तुम्हाला शेतजमीन, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारत हा एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या शेतीवर आधारित आहे. हेच कारण आहे की शेती क्षेत्राला उभारी मिळावी यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे योजना चालवल्या जात आहेत. खरतर अनेकांकडे शेत जमीन आहे.

मात्र आपल्या देशात तसेच राज्यात असेही अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे आज शेत जमीन नाही परंतु त्यांना शेती करण्याची खूपच हौस असते. शिवाय उदरनिर्वाहासाठी अशी जनता दुसऱ्यांच्या शेतात राबते. मात्र, मजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह भागत नाही.

अशा परिस्थितीत, शासनाच्या माध्यमातून ज्या लोकांकडे जमीन नाही मात्र शेती करण्याची इच्छा आहे अशा लोकांसाठी एक विशेष योजना राबवली जात आहे. ही योजना राज्य शासनाच्या शेती महामंडळाकडून राबवली जात आहे.

शेती महामंडळाकडून ज्या लोकांना शेती करायची आहे मात्र शेती नाही अशा लोकांसाठी भाडेतत्वावर जमीन दिली जात आहे. हे शेती महामंडळ राज्य शासनाशी अंगीकृत आहे. या महामंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत संयुक्त शेती केली जात आहे.

खरतर सुरुवातीला शेती महामंडळ स्वतः शेती करत असे. मात्र स्वतः शेती करताना महामंडळाला तोटा सहन करावा लागेल. यामुळे महामंडळाच्या माध्यमातून आता भाडेतत्त्वावर शेतकऱ्यांना जमीन उपलब्ध करून दिली जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला महामंडळाकडे 18 हजार एकर जमीन शिल्लक आहे. शेती महामंडळाकडून एकूण ४१ हजार एकर शेतजमीन भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या शेतजमिनी पैकी जवळपास २३ हजार एकर शेतजमीन १० वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्यात आली आहे.

दरम्यान ज्या शेतकऱ्यांचा १० वर्षांचा करार संपला आहे अशी शेतजमीन पुन्हा महामंडळाच्या माध्यमातून ताब्यात घेतली जाते. यानंतर मग पुन्हा ताब्यात आलेल्या जमिनीसाठी निविदा काढली जाते आणि शेतकऱ्यांना अशी जमीन उपलब्ध करून दिली जाते.

mahatenders.gov.in या वेबसाईटवर शेती महामंडळ शेत जमिनीच्या निविदा प्रसिद्ध करत असते. शेती महामंडळाकडून वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था, खासगी संस्था, बिगर शेतकरी यांना जमीन भाड्याने दिली जाते.

मात्र महामंडळाकडून दिलेली जमिनी फक्त शेतीसाठी दिली जाते. या जमिनीवर कोणताचं दुसरा व्यवसाय सुरू केला जाऊ शकत नाही. प्रक्रिया उद्योग करता येत नाही. वर्षांपेक्षा जास्त काळ चालणारे पीक घेता येत नाही.

म्हणजे चंदन सारख्या झाडांची येथे लागवड करता येणार नाही. तसेच अशा जमिनीवर कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही. तथापि या योजनेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शेती महामंडळाला भेट द्यावी लागणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा