शेतकऱ्यांनो तयारीला लागा…! खरीप हंगामातील पिकातून विक्रमी उत्पादन काढा आणि 50 हजाराचे रोख बक्षीस मिळवा, नोंदणीसाठी ‘इथं’ संपर्क साधा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : राज्य शासनाकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक कौतुकास्पद योजना चालवल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शासनाने नमो शेतकरी योजना तसेच एक रुपयात पिक विमा योजना यांसारख्या शेतकरी हिताच्या योजना सुरू केल्या आहेत.

यातच आता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी, त्यांनी शेतीमधून अधिकचे उत्पादन मिळावे, वेग-वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करावा, शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करून चांगले विक्रमी उत्पादन मिळवावे यासाठी खरीप हंगामात पीक स्पर्धेच आयोजन केल आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून खरीप हंगामातील तृणधान्य आणि कडधान्य पिकांची स्पर्धा आयोजित केली आहे.

खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नासिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

या स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. दरम्यान आज आपण या योजनेत सहभागी होण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात, यासाठी फी किती लागते, तसेच या पीक स्पर्धेतून किती बक्षीस मिळणार आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोणत्या पिकांसाठी आहे स्पर्धा?

कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भात, ज्वारी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग सूर्यफुल या पिकाचा या खरीप हंगामातील पीक स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. मूग व उडीद पिकासाठी 31 जुलै पर्यंत तर उर्वरित पिकांसाठी 31 ऑगस्ट पर्यंत इच्छुक शेतकऱ्यांना सहभाग नोंदवता येणार आहे.

फी किती लागणार?

खरीप हंगामातील या एकच स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना तीनशे रुपये एवढी फी भरावी लागणार आहे. या पिक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी सातबारा उतारा आणि आठ अ उतारा आवश्यक राहणार आहे. तसेच जातीचा दाखला देखील यासाठी आवश्यक आहे. या पिक स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

किती बक्षीस मिळणार ? 

हाती आलेल्या माहितीनुसार, या पिक स्पर्धेतून तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर बक्षीस वितरित होणार आहेत. यात तालुका पातळीवर प्रथम बक्षिस 5 हजार, व्दितीय- 3 हजार, तृतीय-2 हजार आहे. तसेच जिल्हा पातळीवर प्रथम बक्षिस – 10 हजार रूपये, व्दितीय- 7 हजार, तृतीय स्थानावर येणाऱ्यास 3 हजार राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय जे शेतकरी राज्य पातळीवर प्रथम येतील त्यांना 50 हजार, व्दितीय- 40 हजार आणि तृतीय क्रमांकावर राहणाऱ्यां शेतकऱ्याला 30 हजार रुपये दिले जाणार आहेत.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा