नवीन वर्षाच्या आधीच शेतकऱ्यांना मिळाली मोठी भेट ! अखेर ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत 40 कोटी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत आहे. अतिवृष्टी, अवकाळी, ढगाळ हवामान, गारपीट, दुष्काळ अशा एक ना अनेक समस्या शेतकऱ्यांच्या पुढ्यात उभ्या झाल्या आहेत.

शेतकऱ्यांनी जर या समस्येचा सामना करून, अधिकचा उत्पादन खर्च करून शेतमाल उत्पादित केला तर त्यालाही अपेक्षित असा भाव मिळत नाहीये.

यामुळे शेतीचा व्यवसाय मोठ्या संकटात आला आहे. अशातच मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी समजली आहे.

खरे तर संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिके भुईसपाठ झाली होती.

हाता-तोंडाशी आलेला घास आणि अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक एखाद्या भस्मासुराप्रमाणे अतिवृष्टीने खाल्ले होते. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील 26 हजाराहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते.

यामुळे अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. दरम्यान याच शेतकऱ्यांपैकी 23 हजार 10 शेतकऱ्यांच्या खात्यात 40 कोटी 14 लाख रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे.

त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वीच नुकसान भरपाई जमा झालेल्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. यामुळे संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तथापि उर्वरित तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम केव्हा मिळणार हा मोठा सवाल अजूनही कायमच आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त तीन हजार ४५ शेतकऱ्यांची बँक खातेची अडचण असल्याने अतिवृष्टीमुळे नुकसानीची रक्कम मिळण्यासाठी नवीन वर्ष २०२४ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नवीन वर्षात बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक स्वातंत्र्य कक्ष देखील स्थापित झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा