शेतकऱ्यांनो, जमीन खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्या; नाहीतर लाखो रुपयांचे होणार नुकसान, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारतात शेती हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशातील जवळपास 50 ते 60 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या थेट शेतीवर अवलंबून आहेत. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील शेती क्षेत्राशी निगडित आहे. देशातील अर्थव्यवस्थेत शेती क्षेत्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी पाचव्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था आहे.

विशेष म्हणजे काही अर्थतज्ज्ञांनी भारतीय अर्थव्यवस्था लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात कृषी क्षेत्राचा मोलाचा वाटा राहणार आहे. म्हणजे शेतकरी पूर्वीप्रमाणेचं भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.

पण शेती करण्यासाठी दिवसेंदिवस शेत जमीन कमी होऊ लागली आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगीकरण यामुळे शेतीसाठी जमीन कमी पडू लागली आहे. याशिवाय वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीची विभागली देखील होत आहे. आता भारतात संयुक्त कुटुंब पद्धती मोठ्या प्रमाणात लोप पावत चालली आहे.

यामुळे जमिनीची वाटाघाटी होत आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांकडे जमिनीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी जमीन कसण्यासाठी नवीन जमीन खरेदी करत आहेत. सोबतच काहीजण गुंतवणुकीसाठी नव्याने शेत जमीन खरेदी करत आहेत.

पण जमिनीची खरेदी करताना शेतकऱ्यांना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. नाहीतर जमिनीची खरेदी करताना फसवणूक देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत आज आपण जमीन खरेदी करताना शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सातबारा उतारा आणि फेरफार उतारा काळजीपूर्वक पहा : जमिनीची खरेदी करण्यापूर्वी त्या संबंधित जमिनीचा सातबारा उतारा फेरफार उतारा आणि आठ अ उतारा काळजीपूर्वक पाहणे आवश्यक आहे. या उताऱ्यांवर आवश्यक सर्व बाबी यथायोग्य आहेत की नाही याची खातरजमा करा आणि त्यानंतर जमिनी खरेदीचा निर्णय घ्या. अनेकदा शेत जमिनीवर कर्ज घेतलेले असते शिवाय काही शेत जमिनीचे वाद न्यायालयात प्रलंबित असतात.

अशा परिस्थितीत अशा जमिनीची खरेदी केली तर शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागू शकतो. त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. याशिवाय काही जमिनी महामार्गासाठी देखील दिल्या जातात. मात्र तरीही अशा जमिनी विक्रीसाठी निघतात. यामुळे जमीन खरेदी करताना याही गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे.

भोगवटदार 1 आहे की 2 तपासा : जर तुम्ही एखादी जमीन खरेदी करत असाल आणि त्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर भोगवटदार दोन असे लिहिलेले असेल तर अशी जमीन खरेदी करू नये. कारण की भोगवटदार 2 जमिनी खरेदी विक्रीसाठी कायद्याने प्रतिबंध लावण्यात आला आहे. मात्र जर भोगवटदार 1 लिहिलेले असेल तर जमीन खरेदी करण्यास काही हरकत नाही. 

जमिनीचा नकाशा पहा : याशिवाय जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीचा नकाशा पाहणे देखील आवश्यक आहे. नकाशावरून जमिनीची चतुसीमा समजते. अनेकदा नकाशावर जमिनीचे क्षेत्र वेगळे असते आणि प्रत्यक्षात जमीन दुसरीच असते. यामुळे जमीन खरेदी करताना ह्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. नकाशामुळे तुम्हाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा गट क्रमांक समजतो. यामुळे तुम्ही आजूबाजू असलेल्या शेतकऱ्यांशी सदर जमिनीची चौकशी करू शकतात.

शेत रस्ता आहे की नाही तपासा : जी जमीन खरेदी करत आहात त्याला रस्ता आहे की नाही याची देखील खात्री करणे आवश्यक आहे. जर जमिनीला रस्ता नसेल म्हणजेच अशा जमिनीसाठी खाजगी रस्ता असेल तर सदर रस्त्याच्या मालकाची रस्त्यासाठी काही हरकत तर नाही ना याची खात्री करणे आवश्यक आहे. 

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा