शेतकऱ्यांनो तुम्हीही मांजर, कुत्रा पाळताय का ? मग ‘ही’ काळजी घ्या, नाहीतर 6 महिने तुरुंगवास अन 6 हजाराचा दंडही भरावा लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. आपल्या देशाची बहुतांशी जनसंख्या ही उदरनिर्वांसाठी शेती करते. ग्रामीण भागात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतकरी बांधव आपल्या शेतीच्या रक्षणासाठी कुत्रा पाळतात.

काही शेतकरी शेतातच घर बांधून राहत असल्याने शेतकरी बांधव शेतमालाच्या सुरक्षिततेसाठी, जनावरांच्या सुरक्षिततेसाठी कुत्रा पाळतात. जेणेकरून रात्रीच्या वेळी जर कोणी चोर किंवा रानटी जनावरे शेतात घुसली तर कुत्रा भुंकून त्यांना पळवून लावेल.

फक्त शेतकरीच नाही तर अनेक श्वानप्रेमीही असतात, त्यांना कुत्रा पाळण्याची खूप हौस असते. कुत्रा, मांजर असे प्राणी अनेक जण पाळतात. जर तुम्हीही कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राणी पाळलेली असतील तर ही बातमी तुमच्यासाठीचं आहे.

कारण की, प्राणिप्रेमींनी जर कुत्रा, मांजर किंवा इतर पाळीव प्राणी पाळले असतील तर त्यांनी काही गोष्टींची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.

जर तुमच्या पाळीव प्राण्याने एखाद्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केला तर तुम्हाला याबदल्यात जेलची हवा खावी लागू शकते. एवढेच नाही तर मोठा दंड ही तुम्हाला भरावा लागू शकतो.

समजा जर तुम्ही तुमच्या कुत्र्याला पट्टा न लावता फिरायला घेऊन गेलात आणि तुमच्या पाळीव प्राण्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला आणि त्या हल्ल्यात ती व्यक्ती मरण पावली किंवा जखमी झाली तर तुम्हाला 6 महिने तुरुंगवास आणि 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो.

एवढेच नाही तर जर तुमच्याकडे कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी असतील तर त्यांचे वेळेवर लसीकरण करणे देखील बंधनकारक आहे.

पाळीव प्राण्याला लसीकरण केले नसल्यास, पाळीव प्राणी मालकावर देखील कारवाई केली जाऊ शकते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय न्यायालये अशा प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

आतापर्यंत न्यायालयाच्या माध्यमातून कुत्रा चावल्याच्या अनेक प्रकरणांमध्ये पाळीव प्राण्यांच्या मालकांना दोषी ठरवून शिक्षा देण्यात आली आहे.

यामुळे जर तुम्हीही पाळीव प्राणी पाळत असाल तर त्याचे वेळेवर लसीकरण करणे आवश्यक आहे आणि तुमच्या पाळीव प्राण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, त्यांना दुखापत होणार नाही, त्यांचा जीव जाणार नाही याची देखील काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा