Agriculture News : मित्रांनो, भूतपूर्व महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Phule Farmer Loan Waiver Scheme) अंतर्गत शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती.
यावेळी तत्कालीन सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना देखील महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहन म्हणून प्रोत्साहनपर अनुदान (Subsidy) देण्याचा निर्णय घेतला. प्रोत्साहनपर अनुदान म्हणून पात्र शेतकर्यांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने (Government) घेतला होता.
मात्र त्यानंतर राज्यात कोरोना नामक विषाणूचे थैमान पाहायला मिळाले होते. यामुळे महाराष्ट्रसमवेतच संपूर्ण जगात उद्योग जगतात मंदी निर्माण झाली होती. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत खळखळाट निर्माण झाला होता. यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाला राज्यात उद्योगधंदे पूर्ववत झाले.
जनजीवन पूर्ववत झाल्यानंतर शेतकरी बांधवांची 50 हजार रुपये अनुदानाची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, अचानक राज्यात सत्ताबदल झाला. सत्तेत असलेल्या शिवसेनेतून बाहेर पडत तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसोबत भाजपासोबत सोयरीक करत राज्यात नवीन सत्ता स्थापन केली. नवीन सत्तेत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहायला सुरुवात केली आहे.
अशा परिस्थितीत नवोदित शिंदे सरकारने भूतपूर्व महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय फेटाळून लावले. मात्र प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय कायम ठेवला. हाता राज्यातील जवळपास 28 लाख पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान रक्कम मिळणार आहे. विशेष म्हणजे आता या प्रोत्साहनपर अनुदान संदर्भात एक महत्त्वाची अपडेट हाती आलं आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, बँकांनी दिलेल्या यादीची आता पडताळणी झाली आहे. आता आधार पडताळणी झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम यादीचे चावडीवाचन देखील केले जाणार आहे. चावडी वाचन झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात शेतकरी बांधवांच्या खात्यात 50 हजार रुपयांची प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार असल्याचे सांगितले गेले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की नवोदित शिंदे सरकारने प्रोत्साहनपर अनुदान रकमेच्या नियमात थोडासा बदल केला आहे. 2017-18 ; 2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षांत दोनदा पीक कर्जाची नियमित परतफेड केलेल्या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान दिली जाणार आहे.
विशेष म्हणजे 2019 मध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे. आता प्रोत्साहनपर अनुदान रक्कम यासाठी पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी तयार करण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आगामी काही दिवसात सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर या प्रोत्साहनपर अनुदान रकमेचे वाटप लवकर केले जाणार आहे. कारण की आचारसहिता लागल्यास या कामाला विलंब होऊ शकतो.
मित्रांनो छाननी केल्यानंतर आठ दिवसात अंतिम याद्या प्रसिद्ध होणार आहेत. याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर या याद्या लावल्या जातील आणि त्यांचे चावडी वाचन होईल. त्यानंतर बँक खात्याशी आधार प्रमाणीकरण करून संबंधित शेतकरी बांधवांच्या खात्यावर 50 हजार रुपये अनुदानाची रक्कम वर्ग केली जाणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार 20 ऑक्टोबर पूर्वी शेतकरी बांधवांना अनुदानाची रक्कम मिळणार आहे. अनुदानाची रक्कम पात्र शेतकरी बांधवाच्या बचत खात्यात वर्ग केली जाणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांचे कर्ज खाते असल्यास बँकांना अनुदानाची रक्कम वजा करता येणार नाही.