शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी ! ‘या’ योजनेतून गाई-म्हशीसाठी मिळणार दीड लाखांचे कर्ज, अर्ज कुठं करणार ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था ही शेती व शेतीशी निगडित अर्थातच शेतीपूरक व्यवसायांवर आधारित आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम व्हावी यासाठी देशभरातील शेतकऱ्यांकरीता विविध योजना कार्यान्वित केल्या जात आहेत.

या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना शेती करताना तसेच शेतीपूरक व्यवसाय करताना शासनाकडून मदत दिली जात आहे. या योजनांमध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा देखील समावेश होतो. पशु किसान क्रेडिट कार्ड हा किसान क्रेडिट कार्डचा भाग आहे.

शेती हवामान आणि बाजारभाव विषयक बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत पशुपालक शेतकऱ्यांना देखील लाभ दिला जात आहे. पशुपालकांना या योजनेच्या माध्यमातून तब्बल दीड लाखांपर्यंतचे कर्ज पुरवले जात आहे. शेती करताना तसेच पशुपालन व्यवसाय करताना भांडवल आवश्यक असते.

पण अनेकदा शेतकऱ्यांकडे आणि पशुपालकांकडे व्यवसायासाठी भांडवल राहत नाही. अशा स्थितीत शेतकरी सावकाराकडून अधिक व्याजदरात कर्ज घेतात आणि सावकारी कर्जाच्या ओझ्याखाली संपूर्ण आयुष्यभर दबले जातात.

हेच कारण आहे की, केंद्र शासनाने किसान क्रेडिट कार्ड ही योजना सुरू केली आहे. याअंतर्गत पशुपालकांना दीड लाखांपर्यंतचे तसेच शेतीसाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.

किसान क्रेडिट कार्ड योजनेचे स्वरूप

या योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंतचे कर्ज मिळते. हे कर्ज शेतकऱ्यांना खूपच कमी व्याज दरात पुरवले जाते. जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेतात आणि कर्जाची वेळेवर परतफेड करतात त्यांना तीन टक्के व्याजदरात सवलत दिली जाते.

सवलती नंतर शेतकऱ्यांना केवळ चार टक्के व्याजदरात या योजनेअंतर्गत तीन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होते. हे किसान क्रेडिट कार्ड किमान 18 वर्षे आणि कमाल 75 वय वर्ष असलेल्या लोकांना दिले जाते.

अर्ज कुठे आणि कसा करणार

या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो. यासाठी कोणत्याही सरकारी बँकेत जाऊन अर्ज करता येतो. अर्जासोबतच काही आवश्यक कागदपत्रांची देखील पूर्तता करावी लागते.

आवश्यक कागदपत्रे आणि विहित नमुन्या मधील अर्ज भरून बँकेत जमा केल्यानंतर मग पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाते. बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्ड काढले जाऊ शकते किंवा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो.