Agriculture News : आपल्या देशात जवळपास 60% जनसंख्या ही शेतीवर (Farming) आधारित आहे. निम्म्याहून अधिक जनसंख्या शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर (Agriculture Business) आधारित असल्याने भारताची अर्थव्यवस्था देखील शेतीवर (Agriculture) अवलंबून आहे.
अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न (Farmer Income) वाढवण्यासाठी आणि भारतीय अर्थव्यवस्थेला गती प्रदान करण्यासाठी मायबाप शासनाकडून (Government) कायमच वेगवेगळ्या कल्याणकारी योजना (Farmer Scheme) कार्यान्वित केल्या जातात. केंद्र सरकार आपल्या देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना शेती व शेतीपूरक व्यवसायातून चांगली कमाई करता यावे या अनुषंगाने वेग-वेगळ्या शेतकरी हिताच्या योजना (Yojana) सुरू करत असते.
अशीच एक योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना तब्बल 15 लाखांची मदत होणार आहे. अशा परिस्थितीत नेमके 15 लाख रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि ही योजना नेमकी कोणती आहे, तसेच या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या सर्व गोष्टींचा आढावा आज आपण या बातमीमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणती आहे ही योजना?
देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले जावे त्यानुषंगाने केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. पीएम किसान एफपीओ योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी पंधरा लाखांची मदत दिली जाते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सदर 15 लाख रुपये वैयक्तिक शेतकऱ्याला मिळणार नाहीत यासाठी शेतकरी उत्पादक संघटना असणे आवश्यक आहे.
म्हणजेच या योजनेचा लाभ शेतकरी उत्पादक संघटनेला मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय करण्यासाठी पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना किमान 11 शेतकरी मिळून एक शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करावी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी उत्पादक संघटनेमध्ये असलेल्या शेतकरी बांधवांना कृषी उपकरणे, खते-बियाणे, इत्यादी गोष्टींची पूर्तता करणे शक्य होणार आहे.
या योजनेसाठी कसा कराल अर्ज?
या योजनेसाठी अर्ज करणे हेतू शेतकरी उत्पादक संघटनेला सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जावं लागणार आहे. वेबसाइटवर भेट दिल्यानंतर होम पेज ओपन होईल आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना ‘Registration’ या पर्यायावर क्लिक करावं लागणार आहे.
रजिस्ट्रेशन पर्यायावर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू होणार आहे. यामध्ये नोंदणी फॉर्म भरावा लागणारे आहे. सदर नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली माहिती शेतकर्यांना अतिशय काळजीपूर्वक भरावी लागणार आहे. आपल्याला फॉर्ममध्ये खालील माहिती प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
नोंदणी प्रकार
नोंदणी पातळी
पूर्ण नाव
लिंग
पत्ता
जन्मतारीख
पिन कोड
जिल्हा
फोटो आयडी प्रकार
मोबाईल नंबर
ई – मेल आयडी
कंपनीचे नाव
राज्य
तहसील
फोटो आयडी क्रमांक
पर्यायी मोबाईल नंबर
परवाना क्र
कंपनी नोंदणी
बँकेचे नाव
खातेधारकाचे नाव
बँक खाते क्रमांक
IFSC कोड
यानंतर, संबंधित शेतकरी बांधवांना पासबुक अपलोड करा किंवा चेक आणि आयडी प्रूफ अपलोड करावा लागणार आहे. आता सबमिट पर्यायावर क्लिक करावं लागेल.