Agriculture Land Sell Rule : शेतकऱ्यांसाठी आजची बातमी खूपच कामाची ठरणार आहे. खरे तर शेतकरी बांधव शेत जमिनीची खरेदी विक्री करत असतात. अशा परिस्थितीत आजची ही बातमी शेत जमिनीची खरेदी विक्री करणाऱ्यांसाठी खास करणार आहे.
कारण की आज आपण वावर विकल्यानंतर टॅक्स भरावा लागतो का याबाबत आयकर विभागाचे काय नियम आहेत याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
आपणास ठाऊकच आहे की आपल्या देशात व्यावसायिक जमिन, फ्लॅट, प्लॉट, घर, दुकान अशी स्थावर मालमत्ता विक्री केल्यानंतर त्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.
अशा परिस्थितीत शेतजमीन विकल्यावर देखील टॅक्स भरावा लागतो का हा महत्त्वाचा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की काही शेत जमिनी विक्री केल्यानंतर टॅक्स भरावा लागतो आणि काही शेत जमिनी विक्री केल्यानंतर टॅक्स भरावा लागत नाही. ज्या जमिनी कॅपिटल ऍसेट मध्ये येतात, अशा जमिनी विक्री केल्यानंतर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.
परंतु ज्या जमिनी कॅपिटल ऍसेट मध्ये येत नाहीत अशा जमिनीची विक्री झाल्यानंतर त्यावर कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागत नाही. आता आपण नेमक्या कोणत्या जमिनी विकल्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागू शकतो हे थोडक्यात पाहणार आहोत.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर जमीन नगरपालिका किंवा कॅंट बोर्डाच्या हद्दीत येत असेल आणि लोकसंख्या 10,000 पेक्षा जास्त असेल तर अशा शेतजमिनीच्या विक्रीसाठी कॅपिटल गेम टॅक्स भरावा लागतो.
जी जमीन 10,000 पेक्षा जास्त किंवा 1,00,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून दोन किलोमीटरच्या आत येते अशा जमिनी विक्रीनंतर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.
जी जमीन 100,000 पेक्षा जास्त किंवा 10,00,000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंटच्या हद्दीच्या सहा किलोमीटरच्या आत येते अशा जमिनीच्या विक्रीनंतर मिळालेल्या उत्पन्नावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो.
याशिवाय, जी जमीन 10,00,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या कोणत्याही नगरपालिका/कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून आठ किलोमीटरच्या आत येते अशा जमिनीच्या विक्रीवर देखील कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागू शकतो.